Join us

शाब्बास! मुलगा असावा तर असा, सलमान खानने आईला दिले महागडे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 15:03 IST

सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा भारतच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खान सध्या भारतला घेऊन नाही तर दुसऱ्याच एकाकारणामुळे चर्चेत आला आहे.

ठळक मुद्देसलमा खान यांना मुलांने दिलेले हे गिफ्ट खूपच आवडलेसलमानने आईसाठी लग्जरी कार गिफ्ट केली

सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा भारतच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खान सध्या भारतला घेऊन नाही तर दुसऱ्याच एकाकारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे झाले असे की, सलमान खानने आपल्या आईला एक लग्जरी कार गिफ्ट केली आहे. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सलमान खानची आई सलमा खान यांना रोजच्या कामासाठी एका कार खरेदी करायची होती. ही गोष्ट जेव्हा सलमान खानला कळली त्यांने आईसाठी लगेच लग्जरी कार गिफ्ट केली.   

सलमा खान यांना मुलांने दिलेले हे गिफ्ट खूपच आवडले. याआधी सलमानने बहिण अर्पिता सुद्धा महागडी गाडी गिफ्ट केली होती. सलमानच्या सिनेमाबाबत बोलायचे झाले तर भारत सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. 'भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. 

टॅग्स :सलमान खानभारत सिनेमाकतरिना कैफ