Join us

भाईजानचा जबरा फॅन! 'सिकंदर'ची दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना वाटल्या, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:20 IST

सलमान खानच्या चाहत्याने 'सिकंदर'ची लाख रुपयांची तिकीटं खरेदी करुन प्रेक्षकांना फुकट वाटल्या आहेत. वाचा सविस्तर (sikandar)

 'सिकंदर' सिनेमाची (sikandar movie) सध्या चर्चा आहे. या सिनेमात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे. सलमानच्या चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत. सलमानचा नवीन सिनेमा हा त्याच्या चाहत्यांसाठी एका उत्सवासारखा असतो. 'सिकंदर' निमित्ताने सलमानचा (salman khan) अनेक वर्षांनी बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यानिमित्ताने सलमानच्या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत सलमानचा चाहत्याने तब्बल दीड लाखांची तिकीटं खरेदी करुन ती सर्वांना वाटली आहेत.

सलमानच्या चाहत्याने खरेदी केली दीड लाखांची तिकीटं

सलमान खानचा मोठा चाहता असलेल्या कुलदीप कसवानने राजस्थानमधील एका थिएटरमध्ये जाऊन तब्बल दीड लाखांची तिकीटं खरेदी केली. सलमानच्या लवकरच रिलीज होणाऱ्या 'सिकंदर' सिनेमाची तिकीटं या चाहत्याने खरेदी केली आहेत. ही तिकीटं खरेदी करुन कुलदीपने प्रेक्षकांमध्ये ही तिकीटं वाटून टाकली. यासाठी कुलदीपने प्रेक्षकांकडून कोणतेही पैसे घेतले नाहीत. फुकट मिळणाऱ्या तिकीटी खरेदी करायला प्रेक्षकांची मोठी रांग लागलेली व्हिडीओत दिसतेय.

सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा उद्या ३० मार्चला रिलीज होणार आहे. 'सिकंदर'  सिनेमात सलमान प्रमुख भूमिकेत असून त्यासोबत रश्मिका मंदाना, सत्यराज, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर हे कलाकार झळकणार आहेत. 'गजनी' सिनेमाचे दिग्दर्शक ए.आर. मुरुगोदास यांनी 'सिकंदर'चं दिग्दर्शन केलंय. ३० मार्चला पहाटेपासून संपूर्ण भारतात 'सिकंदर'चे  शो सुरु होणार आहेत. भाईजानचा 'सिकंदर' कसा असणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानाशरमन जोशीबॉलिवूड