Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड कलाकारांच्या बॉडीगार्ड्सचा पगार वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 12:42 IST

आज आम्ही तुम्हाला कलाकारांच्या बॉडीगार्ड्सचे पगार सांगणार आहोत. मोठ्या कलाकारांच्या या बॉडीगार्ड्सना इतका पगार मिळतो की, तुम्हाला विश्वासही बसणार नाही. 

मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या मानधनाबाबत नेहमीच चर्चा होते. त्यांच्या लाइफस्टाईल आणि सुरक्षेबाबतही नेहमी चर्चा होते. पण त्यांच्या बॉडीगार्ड्सना किती पगार असेल याचा कधी विचार केलाय का? कधी ना कधी तरी हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण त्याविषयी फार चर्चा होताना दिसत नाही. पण आज आम्ही तुम्हाला कलाकारांच्या बॉडीगार्ड्सचे पगार सांगणार आहोत. मोठ्या कलाकारांच्या या बॉडीगार्ड्सना इतका पगार मिळतो की, तुम्हाला विश्वासही बसणार नाही. 

1) शेरा - सलमान खान

शेरा हा गेल्या 20 वर्षांपासून अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड आहे. तो आता सलमानच्या परिवाराती एक सदस्यच झाला आहे. इतकेच काय तर सलमानने 'बॉडीगार्ड' हा सिनेमा शेराला डेडिकेट केला होता. शेराला वर्षाला तब्बल 2 कोटी रुपये पगार मिळतो. म्हणजे वर्षाला 16 लाख पगार मिळतो.

2)  रवी सिंग - शाहरुख खान

(Image Credit : InUth.com)

शाहरुख खानचा चाहतावर्ग किती आहे हे काही वेगळं सांगायला नको. तो तिथेही जातो त्याचे चाहते एकच गर्दी करतात. या गर्दीत त्याला सुरक्षित ठेवणारा माणूस आहे बॉडीगार्ड रवी सिंग. गेल्या अनेक वर्षांपासून रवी सिंग हा शाहरुखसोबत आहे. रवी सिंगला याला बॉलिवूडच्या किंगचं संरक्षण करण्यासाठी वर्षाला 2.5 कोटी रुपये इतका पगार मिळतो. 

3) युवराज घोरपडे - आमिर खान

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या सुरक्षेची जबाबदारी ही अभिनेता रोनित रॉय याच्या एजन्सीकडे आहे. आणि आमिरचा बॉडीगार्ड युवराज घोरपडे याच एजन्सीमधील आहे. यवराजला आमिरचं संरक्षण करण्यासाठी वर्षाला 2 कोटी रुपये इतका पगार आहे. 

4) जलाल - दीपिका पादुकोन

दीपिका पादुकोनने बॉडीगार्ड जलाल याला राखी बांधल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. दीपिका जलालला भाऊ मानते. जलाल याला दीपिकाचं संरक्षण करण्यासाठी वर्षाला 80 लाख पगार मिळतो. 

5) जितेंद्र शिंदे - अमिताभ बच्चन

(Image Credit : Mid Day)

बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही जितेंद्र शिंदे याच्यावर आहे. तो सतत सावलीसारखा त्यांच्यासोबत असतो. जितेंद्र शिंदे याला वर्षाला 1.5 कोटी रुपये इतका पगार मिळतो. 

6) श्रेयस ठेले - अक्षय कुमार 

(Image Credit: Filmymantra.com)

अक्षय कुमार कितीही फिट असला आणि त्याला मार्शल आर्ट येत असलं तरी गर्दीत त्याला सुरक्षेची गरज पडतेच. अशात त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम त्याचा बॉडीगार्ड श्रेयस ठेले हा करतो. त्याला यासाठी वर्षाला 1.2 कोटी रुपये पगार दिला जातो.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी