Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इतक्या' वाजता रिलीज होणार प्रभासच्या 'सालार' सिनेमाचा ट्रेलर; चित्रपटाच्या मेकर्सनं दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:07 IST

प्रभासच्या आगामी 'सालार'  सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

सुपरस्टार प्रभासला कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. त्याचे चित्रपट लार्जर दॅन लाइफ असतात.  प्रभासच्या नवीन सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.  प्रभासच्या आगामी 'सालार'  सिनेमाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाचा ट्रेलर 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.19 वाजता प्रदर्शित होणार आहे. या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. प्रभासचा सालार हा चित्रपटही KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आशा आहे की यशच्या केजीएफप्रमाणेच प्रभासचा सालारही धमाकेदार असेल.

सालार चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी, टिन्नू आनंद यांच्यासह अन्य कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीसह 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यामुळे आता 'सालार' नक्की किती कमाई करतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :प्रभाससेलिब्रिटीTollywood