'सैयारा' सिनेमामुळे रातोरात स्टार झालेला अभिनेता अहान पांडेच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. अहान पांडेचा विविधांगी अभिनय त्यांना बघायचा आहे. अहानला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान अहानला आणखी एक सिनेमा ऑफर झाल्याची माहिती आहे. वायआरएफ च्या अंतर्गतच हा सिनेमा बनणार आहे. या सिनेमात अहानची अभिनेत्री कोण असणार माहितीये का?
यशराज फिल्म्सच्या 'सैयारा'मुळे अहान पांडे पहिल्याच सिनेमातून लोकप्रिय झाला. आता वायआरएफच्याच आगामी सिनेमात अहान पांडे मुख्य भूमिका साकारणार आहे. हा एक रोमान्स आणि ग्रँड अॅक्शनने भरलेला सिनेमा असणार आहे. अली अब्बास जफर यांच्यावर दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अहानच्या ब्लॉकबस्टर पदार्पणानंतर आता सर्वांच्या नजरा त्याच्या आगामी सिनेमाकडे असणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सिनेमात त्याच्या अपोझिट शर्वरी वाघला कास्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अहान आणि शर्वरी ही नवी फ्रेश जोडी बॉलिवूडला मिळणार आहे. तसंच सिनेमाचं शूट पुढील वर्षीच सुरु होणार आहे.
शर्वरी वाघ सध्या वायआरएफच्याच आगामी 'अल्फा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती आणि आलिया भट जबरदस्त अॅक्शन सीन्स देणार आहेत. तसंच सिनेमात दोघी बॉबी देओलला भिडणार आहेत. शर्वरी वाघलाही वायआरएफनेच बॉलिवूडमध्ये संधी दिली होती. तर दिग्दर्शक अली अब्बास यांनी यापूर्वी 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. शर्वरी वाघ मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. तर अहान हा चंकी पांडे यांचा पुतण्या आहे.
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
भन्साळींसोबतही काम करण्याची शक्यता?केवळ अली अब्बास जफरच नाही, तर अहान पांडे संजय लीला भन्साळी यांच्यासोबतही चित्रपट करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकताच अहान भन्साळी यांच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे, अहान हा संजय लीला भन्साळी यांच्या पुढील चित्रपटाचा हिरो असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. मात्र या संदर्भात भन्साळी किंवा अहान या दोघांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
Web Summary : Ahaan Panday, famed from 'Saiyara,' may star opposite Sharvari Wagh in a YRF action romance directed by Ali Abbas Zafar. Bhansali collaboration possible.
Web Summary : 'सैयारा' से मशहूर अहान पांडे, अली अब्बास जफर द्वारा निर्देशित वाईआरएफ एक्शन रोमांस में शरवरी वाघ के साथ दिख सकते हैं। भंसाली के साथ भी काम करने की संभावना है।