Join us

डोंगराच्या उंच कड्यावर पोहोचला आकाश; फोटो पाहून येईल अंगावर काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 18:24 IST

Akash Thosar: आकाशच्या फोटोची होतीये चाहत्यांमध्ये चर्चा

रांगड्या मातीत लहानाचा मोठा झालेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर(Akash Thosar). कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चीत करणाऱ्या आकाशने सैराटच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. त्यामुळे आज लोकप्रिय कलाकारांच्या यादीत त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आकाश सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून नुकताच त्याने एक भन्नाट फोटो शेअर केला आहे.

मध्यंतरी आकाशने एका खळखळत्या धबधब्यावर रॅपलिंग केलं होतं. इथेच त्याने मस्तपैकी बटाटाभजी करत त्याचं पाककौशल्यदेखील दाखवलं होतं. त्यानंतर आता त्याने आणखी एक भन्नाट फोटो शेअर केला आहे.

"आयुष्यात एक प्रवास आवर्जून असा करावा,सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक विसावा जरूर घ्यावा", असं कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तो अगदी उंच डोंगराच्या टोकावर मस्तपैकी झोपला आहे.  दरम्यान, त्याचा हा फोटो पाहून अनेकांनी भीती व्यक्त केली आहे. तर, काहींनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. आकाशने सह्याद्रीच्या कुशीमध्ये हा फोटो काढला आहे. 

टॅग्स :आकाश ठोसरसेलिब्रिटीसिनेमामराठी अभिनेता