Join us

'माझी एक्स गर्लफ्रेंड नक्कीच जळत असेल'; सायलीच्या प्रश्नावर आकाशने दिलेल्या उत्तराची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:42 IST

Akash thosar: सायलीने आकाशला त्याच्या गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला आणि आकाशला खरं उत्तर द्यावं लागलं.

'सैराट' (sairat) सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारा आकाश ठोसर (akash thosar) सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्या आगामी घर बंदूक बिरयानी (ghar banduk biryani) या आगामी सिनेमात आकाश पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या आकाश या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आकाशने त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेखील अनेक खुलासे केले. यात त्याने पहिल्यांदाच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे.

अलिकडेच आकाश आणि सायली (sayali patil) या जोडीने 'घर बंदूक बिरयानी'च्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी या दोघांसोबत एक मजेशीर खेळ खेळण्यात आला. यात सायलीने विचारलेल्या प्रश्नांची आकाशला खरी उत्तरं द्यायची होती. विशेष म्हणजे सायलीने आकाशला त्याच्या गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला आणि आकाशला खरं उत्तर द्यावं लागलं.

गोकुळासारखं आहे आकाश ठोसरचं कुटुंब; पहा कोण आहे त्याचा फॅमिलीमध्ये 

'एक्स गर्लफ्रेंडला टोमणे मारण्यासाठी कधी स्टेटस किंवा पोस्ट ठेवली आहेस का?' असा प्रश्न सायलीने आकाशला विचारला. त्यावर, 'त्याची गरजच नाही आपल्याला. ती असंच पाहून जळत असेल', असं उत्तर आकाशने दिलं. 

दरम्यान, आकाशने दिलेल्या या उत्तरामुळे त्याच्या आयुष्यात यापूर्वी कोणीतरी खास व्यक्ती होती की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. आकाश ठोसर लवकरच घर बंदुक बिरयाणी या सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत सायली पाटील, नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ७ एप्रिल, २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :आकाश ठोसरसेलिब्रिटीनागराज मंजुळेसिनेमा