Saif Ali Khan Met Auto Driver: बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान काल पाच दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी घरी पोहोचला. १६ जानेवारी रोजी एका बांगलादेशी घुसखोराने सैफच्या वांद्रे येथील घरावर हल्ला (Saif Ali Khan Stabbing Case) केला होता. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला आणि सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जेव्हा सैफवर हल्ला झाला होता, तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यासाठी घरी ड्रॉयव्हर नव्हता, गाडी तयार नव्हती. तेव्हा एका रिक्षामधून सैफ रुग्णालयात पोहचला होता. आता सैफनं त्या रिक्षाचालकाची (Rickshaw Driver Bhajan Lal) भेट घेत त्याचे आभार मानले आहेत.
जेव्हा सैफ रक्तबंबाळ अवस्थेत रिक्षात बसला, तेव्हा रिक्षा चालकानं त्याला ओळखलं नाही. पण, त्याला रक्तानं माखलेलं पाहून ताबडतोब आठ-दहा मिनिटांत लीलावती रुग्णालयाच्या इमर्जन्सी गेटवर पोहचवलं आणि डॉक्टरांना आवाज दिला. यानंतर कर्मचारी व्हिलचेअर घेऊन आले. रिक्षातून उतरून 'अरे मै सैफ अली खान हूँ' असं अभिनेत्यानं म्हटलं आणि कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. तेव्हा रिक्षातून आपण बॉलिवूड स्टारला आणल्याचं रिक्षा चालकला समजलं.
या रिक्षा चालकाचं नाव भजन सिंह असं आहे. वेळेवर रुग्णालयात पोहचवणाऱ्या या रिक्षा चालकाला सैफदेखील विसरला नाही. सैफनं बरं झाल्यानंतर भजन सिंहला रुग्णालयात बोलावलं आणि त्याची भेट (Saif Ali Khan Meets Auto Driver) घेतली. एवढंच काय तर सैफ भजन सिंहच्या खांद्यावर हात ठेवून फोटोही काढला. सैफने ऑटो ड्रायव्हरचे आभार मानले. यावेळी सैफ अली खानची आई शर्मिला टागोर देखील उपस्थित होत्या. त्यांनीदेखील ऑटो ड्रायव्हरबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सैफ हसत म्हणाला, "त्यादिवशी पैसे दिले नाही. पण, रिक्षाचं जे काही भाडं असेल ते आपण देऊ". इतकंच नव्हे तर गरज पडल्यास त्याला मदत करण्याचंही आश्वासन दिलं आहे.
भजनसिंग राणानं तो रुग्णालयात कसा पोहोचला, याबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितलं. तो म्हणाला, "सर्व माध्यम प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. म्हणून मग मास्क घालून रुग्णालयात आलो". दरम्यान सैफच्या एका चाहत्यानं भजन सिंह राणा याला मदतीसाठी बक्षिस म्हणून ११ हजार रुपये देत सन्मान केला.