Join us

सैफ अली खानच्या मानेवर दिसल्या चाकू हल्ल्याच्या जखमा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:25 IST

नुकतंच सैफच्या मानेवरील जखमांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Saif Ali Khan Knife Attack: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Case) १६ जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरानं सैफ अली खानवर हल्ला केला होता. चोरने सैफवर ६ वेळा वार केले होते. यातील दोन खोल जखमा आहेत. यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ, तर दुसरी मानेजवळ झाली. सैफवर लिलावती रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता नुकतंच सैफच्या मानेवरील जखमांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सैफ अली खान लवकर 'The Jewel Thief' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या टीझर लाँच सोहळ्यात सैफ सहभागी झाला. या कार्यक्रमातील सैफचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सैफच्या मानेवरील जखमा दिसत आहेत. तसेच त्याच्या हातालाही बँडेड दिसलं. 

प्राणघातक हल्ल्यानंतर सैफ अली खान पहिल्यांदाच एका कार्यक्रमात उपस्थित राहिला. सैफचे हे फोटो करिना कपूरच्या एक फॅन पेजने शेअर केले आहेत. ज्यातून सैफवरील हल्ला एक पब्लिसिटी स्टंट होता असा दावा करणाऱ्यांना उत्तर दिलंय. 

सैफचा "ज्वेल थेफ्ट – द रेड सन चॅप्टर" हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सैफबरोबर यामध्ये जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता पाहायला मिळणार आहेत.  या चित्रपटाची कथा  ५०० कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या चोरीवर आधारित आहे.दरम्यान, सध्या सैफला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. 

 

टॅग्स :सैफ अली खान सेलिब्रिटीबॉलिवूडनेटफ्लिक्स