Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खान आणि करिना कपूरच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण; बेबोने शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 12:59 IST

सैफ अली खान आणि करिना कपूर खान या दोघांच्या लग्नाला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

 सैफ अली खान आणि करिना कपूर खान बॉलिवूड इंडस्टीतील  मोस्ट पॉप्युलर आणि चार्मिंग कपल्सपैकी एक मानले जातात. दोघांच्या लग्नाला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी लग्न केले होते. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने पती सैफला एक खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूरने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह करीनाने लिहिलं, ''हे आपण आहोत, तू, मी आणि पिझ्झा, कायमचं प्रेम, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा नवरोबा''. बेबोने शेअर केलेल्या या फोटोत ती निळ्या रंगाचे जॅकेटमध्ये पिझ्झा खाताना दिसत आहे. तर निळ्या रंगाचेच जॅकेट आणि पांढरा कुर्ता पायजमा घातलेला सैफ करीनाच्या खांद्यावर हात ठेवून जबरदस्त स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.  चाहत्यांसह इंडस्ट्रीतील मित्रांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे. 

 बॉलिवूडच्या या स्टार जोडप्याला चाहते प्रेमाने 'सैफिना' म्हणतात. अस म्हटलं जातं सैफ आणि बेबो पहिल्यांदा 2008 मध्ये टशन चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. शूटिंग दरम्यान, सैफ आणि करिनामध्ये जवळीकता वाढली होती. दीर्घ रिलेशनशिपनंतर या दोघांनी एकेमकांसोबत लग्नगाठ बांधली.  लग्नाच्या 11 वर्षांनंतरही सैफिनाचं एकमेकांवरील प्रेम कायम आहे. करिना-सैफला दोन मुलं आहेत. तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान बॉलिवूडसेलिब्रिटी