Join us
Daily Top 2Weekly Top 5

Saheb, Biwi aur Gangster 3 Trailer : 'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, क्राईम-बोल्ड सीन्सचा भडीमार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 16:37 IST

'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजवाडे, क्राई आणि राजकारण यांच्याशी निगडीत कथा बघायला मिळाल्या. संजय दत्त पहिल्यांदाच या सीरिजमध्ये काम करतो आहे. या सिनेमात तो गॅंगस्टरची भूमिका साकारतो आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित 'संजू' सिनेमा एकीकडे रिलीज झाला असताना त्याच्या 'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. 

'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना राजवाडे, क्राईम आणि राजकारण यांच्याशी निगडीत कथा बघायला मिळाल्या. संजय दत्त पहिल्यांदाच या सीरिजमध्ये काम करतो आहे. या सिनेमात तो गॅंगस्टरची भूमिका साकारतो आहे. 

संजय दत्तसह या सिनेमात माही गिल, चित्रांगडा सिंह. सोहा अली खान आणि जिमी शेरगील मुख्य भूमिकेत आहे. आधीच्या सिनेमांप्रमाणेच या सिनेमातही क्राईम आणि बोल्ड सीन्सची भडीमार बघायला मिळत आहे. तिग्मांशू धुलियाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून हा सिनेमा 27 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :संजय दत्तबॉलिवूड