Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् दोन स्पेशलच्या मंचावर सचिन पिळगांवकर झाले भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 07:15 IST

दोन स्पेशल या कार्यक्रमामध्ये पुढील आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगांवकर आणि हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते यांनी हजेरी लावली आहे.

दोन स्पेशल या कार्यक्रमामध्ये पुढील आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगांवकर आणि हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते यांनी हजेरी लावली आहे.जितेंद्र जोशी यांनी त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. गप्पागोष्टींसोबत सचिन पिळगांवकर यांनी काही कधी न सांगितलेले किस्से, आठवणी मंचावर सांगितले.

या दोघांमध्ये प्रश्नउत्तरांचा गेम देखील रंगला. सचिन पिळगांवकर यांनी श्रिया आणि त्यांच्यामध्ये घडलेला एक किस्सा सांगितला...  जितेंद्र जोशी यांनी जेंव्हा सचिन पिळगांवकर यांना विचारले “तुम्ही कधी श्रियाला सांगितले आहे का हे कर, किंवा हे करू नकोस ? त्यावर ते म्हणाले अजिबात नाही, त्या भानगडीत मी कधीच पडलो नाही. ती ऐकणार नाही आणि तिने ऐकू पण नाही असे मला वाटते. त्यावर अवधूतने सांगितले, जेंव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेंव्हा मी आणि माझ्या बायकोने श्रियाला प्रोत्साहन दिले की तू अभिनय करायला पाहिजे... त्यावर सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘याने सांगितल्यावर माझ्या डोक्यामध्ये सूत्र सुरू झाली होती, आणि मी परत येताना तिला विचारले की मी विचार करतो आहे चित्रपट बनावायचा तर तू करशील का? त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटेल ती त्यावेळेस म्हणाली “मला स्क्रिप्ट द्या मी ठरवते”.   

पुढे जितेंद्र जोशी यांनी सचिन पिळगांवर यांना विचारले, “एका कलाकाराने असे म्हटले होते की, सचिन पिळगांवकर हे बॅग आणि बॅगेजेस घेऊन येतात ते जर त्यांनी नाही केले तर त्यांच्यासारखा दुसरा अभिनेता नाही. यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले, ते काय होते याचे उत्तर प्रेक्षकांना पुढील आठवड्यातील दोन स्पेशलच्या भागामध्ये मिळेल. सचिन पिळगांवकर यांनी दोन स्पेशलच्या मंचावर गुरुदत्त साहेब यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण सांगितली... गुरुदत्त साहेब यांच्या निधनानंतर आत्मारामजी म्हणजे गुरुदत्तजी यांचे धाकटे बंधु त्यांचा फोन का आला आणि पुढे ते काय म्हणाले ?

याचसोबत एका गेममध्ये त्यांना गाणी ओळखायची होती तर दुसर्‍या गेममध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांची हो की नाही मध्ये उत्तर द्यायची  होती.. भाजीमार्केट मध्ये बार्गेनिंग केले आहे का ? यावर दोघांनी हो असे उत्तर दिले. बायकोसाठी कधी गजरा घेऊन गेला आहात का? हा प्रश्नांचा हा गेम सुरू राहिला... सचिन पिळगांवकर जेंव्हा त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवला तेव्हा अत्यंत भावुक झाले.

टॅग्स :कलर्स मराठीसचिन पिळगांवकरअवधुत गुप्ते