Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत खुशबू तावडेचं ढोलवादन, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 16:29 IST

खुशबूने गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोलपथकासोबत ढोलवादन केलं. ढोलवादन करत खुशबूने शोभायात्रेत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

आज ९ एप्रिलपासून हिंदू नववर्षाला सुरुवात होत आहे. घरोघरी गुढी उभारून हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस साजरा करत नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातात. या शोभायात्रांमध्ये दरवर्षी कलाकारही सहभागी होताना दिसतात. 

यंदाही शोभायात्रेत कलाकार मोठ्या उत्साहात सहभागी झालेले दिसले.  या शोभायात्रेत झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या टीमनेही हजेरी लावली होती. खुशबू तावडे, दक्षता जोईल या ऑनस्क्रीन मायलेकीची जोडी गिरगावच्या शोभायात्रेत दिसली. शोभायात्रेत ढोल पथक हे प्रमुख आकर्षण असतं. खुशबूने गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोलपथकासोबत ढोलवादन केलं. ढोलवादन करत खुशबूने शोभायात्रेत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांची टीमही शोभायात्रेत सहभागी झाली होती. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सेलिब्रिटींनी मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला. पूजा सावंत, शिवानी सुर्वे, प्रथमेश परब यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा केला.तर ऋतुजा देशमुख, रितेश देशमुख या कलाकारांनीही घरी गुढी उभारली.  याचे फोटो कलाकारांनी शेअर केले आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारगुढीपाडवासेलिब्रिटी