Join us

RRR स्टार राम चरणची पत्नी उपासनाच्या चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 14:34 IST

लग्नाच्या १० वर्षानंतर रामचरण आणि उपासना आई-बाबा होणार आहेत. आई होण्याचा आनंद उपासनाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय.

Ramcharan : साऊथ सुपरस्टार रामचरणने आणि त्याची पत्नी उपासना यांच्या आयुष्यात तिसऱ्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. 'श्री हनुमानजीच्या कृपेने आमच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे' अशी घोषणा रामचरणने सोशल मीडियावरुन केली होती. यानंतर चाहते दोघांवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

आता सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना हिने प्रेग्नेंसी घोषणा केल्यानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये, राम चरणची पत्नी तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करताना कुटुंबातील जवळच्या सदस्यांसोबत दिसतेय. उपासना कामिनेनीच्या या फोटोंनी चाहत्यांचीही मनं जिंकली. हे फोटो पाहून अनेक स्टार्स तिला आई होणार म्हणून शुभेच्छा देत आहेत. 

 

प्रेग्नेंसीचा ग्लो उपासनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. १४ जुन २०१२ साली रामचरण आणि उपासना लग्नबंधनात अडकले. हैदराबाद येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक राजकीय आणि साऊथ, बॉलिवुड कलाकारांनी लग्नात हजेरी लावली. लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे येणारे नवे वर्ष नक्कीच रामचरणसाठी खास असणार आहे. 

 

टॅग्स :आरआरआर सिनेमाराम चरण तेजाTollywood