Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार, धक्कादायक घटनेनंतर मुंबई पोलिसांनी दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 09:44 IST

Rohit Shetty Firing Mumbai Police Investigation Updates: पोलिसांकडून कसून तपासणीला सुरुवात, काय-काय सापडलं?

Rohit Shetty Firing Mumbai Police Investigation Updates: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी मध्यरात्री गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरा एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर आला. ओळख पटू नये म्हणून त्याने 'हुडी' घातली होती. अचानक आपल्याजवळील बंदुकीतून बंगल्याच्या दिशेने त्याने ४ गोळ्या झाडल्या आणि काचा फोडल्या. गोळीबारानंतर तरुण दुचाकीवरून फरार झाला.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, ४ बुलेट शेल मिळाल्या...

रविवारी पहाटे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस दलाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तपासाचे मुख्य लक्ष हल्लेखोरांची ओळख पटवण्यावर आहे. पोलिसांनी सांगितले की, जुहू परिसरातील आणि शेट्टी यांच्या घराच्या आसपास लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. "हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते की अन्य वाहनाने, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पथक फुटेजचे बारकाईने विश्लेषण करत आहे." असे एका पोलीस अधिकाऱ्याने नमूद केले. घटनास्थळी पोहोचलेल्या गुन्हे शाखेच्या आणि जुहू पोलिसांच्या पथकाने प्राथमिक तपासात ४ राऊंड गोळ्या झाडल्या गेल्याची पुष्टी केली आहे. कारण पोलिसांना घटनास्थळावरून चार रिकाम्या बुलेट शेल मिळाल्या आहेत. त्या फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत.

सुरक्षा वाढवली, धमकीच्या अँगलचा विचार

"घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत," असे पोलिसांनी स्पष्ट केले. यापूर्वी बॉलीवूडमधील इतर कलाकारांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, रोहित शेट्टी यांनाही असा काही धमकीचा फोन किंवा संदेश आला होता का, या अँगलमधून पोलीस तपास करत आहेत. "अद्याप या गोळीबाराची जबाबदारी कोणत्याही गँगने घेतलेली नाही, तरीही सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत," अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. जुहू परिसरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने कळवण्यास सांगितले आहे.

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा (Crime Branch) या प्रकरणाचा समांतर तपास करत असून लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Firing at Rohit Shetty's Bungalow: Mumbai Police Launch Investigation

Web Summary : Unidentified assailants fired at Rohit Shetty's Juhu bungalow. Mumbai police are investigating, reviewing CCTV footage, and analyzing bullet shells. Security has been heightened. Police are exploring potential threat angles and appealing for public vigilance. Crime Branch is conducting a parallel investigation.
टॅग्स :रोहित शेट्टीगोळीबारमुंबईबॉलिवूडगुन्हेगारी