Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 14:14 IST

रोेहित राऊतचा हिंदीतही डंका

मराठी 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर. या पाचही जणांनी आज संगीत क्षेत्रात नाव कमावलं आहे. प्रत्येकाच्या गाण्याचा जॉनर वेगळा आहे. या पाच जणांमध्ये रोहित राऊत (Rohit Raut) नेहमीच वेगळ्या धाटणीची गाणी गाताना दिसला. इतक्या वर्षांनी रोहितला पहिला हिंदी ब्रेक मिळाला आहे.

रोहित राऊतने मराठी सिनेमांमध्ये आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. काही गाण्यांचं संगीत दिग्दर्शनही केलं आहे. रोहितने इंडियन आयडॉलही गाजवलं होतं. यामध्येही तो रनर अप ठरला. रोहितचं टॅलेंट हिंदीतील संगीत दिग्गजांनीही पाहिलं. आता अखेर त्याने पहिल्यांदा हिंदी सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड केलं आहे. संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यांनी त्याला ही संधी दिली. रोहितने पोस्ट शेअर करत लिहिले, "स्वप्न खरी होतात. हिंदी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणं रेकॉर्ड केलं. मला आझ किती आनंद होतोय हे मी शब्दात सांगू शकत नाही. विशाल ददलानी सरांचे मनापासून आभार. "

रोहितच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनीही कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. रोहितला या उंचीवर पोहोचलेलं पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आहे.रोहितची बायको जुईली जोगळेकर ही सुद्धा उत्तम गायिका आहे. दोघंही मिळून अनेकदा स्टेज शो करत असतात. या सुरेल जोडीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. 

टॅग्स :रोहित राऊतसंगीतविशाल ददलानीबॉलिवूड