Join us  

कसा शूट झाला धर्मेंद्र-शबाना आझमी यांचा किसिंग सीन;अभिनेत्रीने सांगितलं सेटवर होते किती लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 10:48 AM

Rocky aur rani ki prem kahani: या सिनेमातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील किसिंग सीनची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वीच करण जोहरचा रॉकी आणि रानी की प्रेमकहाणी हा बहुचर्चित ठरलेला सिनेमा रिलीज झाला. रणवीर सिंग (ranveer singh) आणि आलिया भट्ट (alia bhatt)  यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. या सिनेमातील धर्मेंद्र (dharmendra) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सुद्धा सध्या जोरदार चर्चा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या सीनवर व्यक्त होत आहेत. यामध्येच आता सिनेमातील एका अभिनेत्रीने हा सीन शूट होत असताना सेटवरचं वातावरण कसं होतं हे सांगितलं आहे.

रॉकी और रानी की प्रेमकहाणी या सिनेमातील अंजली आनंद (anjali anand) हिने अलिकडेच सिद्धार्थ कन्ननच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने धर्मेंद्र-शबाना आझमी यांचा किसिंग सीन कसा शूट झाला हे सांगितलं. मुळात हा सीन पाहिल्यावर मला आणि रणवीरला खूप आश्चर्य वाटत होतं खरंच हे असं घडतंय का? असा प्रश्न आम्हाला पडला होता, असं अंजली म्हणाली.

'दिग्दर्शकासोबत शरीरसंबंध..'; 'रॉकी और राणी' फेम अभिनेत्रीला आला बॉडी शेमिंगचा वाईट अनुभव

"हा सीन शूट होत असताना आम्ही खूप उत्साहात होतो सोबतच आश्चर्यचकितही झालो होतो. सेटवर कुठलाही आवाज नव्हता. सगळे जण शांत होते. आपल्यासमोर सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार परफॉर्म करत आहेत यावर रणवीरचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही पाहात होतो शबाना जी चालत येत आहेत आणि त्यांच्या बाजूने वारा वाहतोय. त्या गातायेत. मी विचार करत होते, मी आणि रणवीर इथे काय करतोय? आपण दिग्गजांसमोर आहोत आणि ते परफॉर्म करत आहेत. एक वेळ रणवीरचं इथे असणं ठीक आहे. पण, मी इथे असण्यास पात्र आहे का? तुम्ही विचार करु शकत नाही त्यावेळी माझी अवस्था काय झाली असेल", असं अंजली म्हणाली. दरम्यान, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या या सीनवर हेमा मालिनी, सनी देओल यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

टॅग्स :बॉलिवूडधमेंद्रशबाना आझमीरणवीर सिंगआलिया भटकरण जोहरसेलिब्रिटीसिनेमा