Join us
Daily Top 2Weekly Top 5

GOOD NEWS : लग्नानंतर वर्षभरातच रोडीज फेम रघु राम झाला बाबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 11:04 IST

 रघु रामने डिसेंबर 2018 मध्ये नतालीसोबत लग्नगाठ बांधली होती.

ठळक मुद्देरघु रामचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न सुगंधा गर्गसोबत झाले होते.

‘एमटिव्ही रोडीज’ या शोमुळे लोकप्रिय झालेला रघु राम याच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. होय,रघु रामची पत्नी नताली डी लुसियो हिने सोमवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बाळाचे ‘रिदम’ असे नामकरण करण्यात आले आहे. रघु रामने डिसेंबर 2018 मध्ये नतालीसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर वर्षभरात हे कपल आई-बाबा झाले. मुंबई मिररशी बोलताना खुद्द रघुने ही माहिती दिली. आई व बाळ दोघेही स्वस्थ आहेत. नतालीने बाळाला जन्म देण्यासाठी वॉटर बर्थ आणि हाइपोबर्थिंग तंत्राचा वापर केला होता. ही एक शांत, सुंदर व नैसर्गिक पद्धत आहे. आम्ही आमच्या बाळाच्या आगमनाने आनंदीत आहोत. आम्ही त्याचे नाव रिदम ठेवले आहे. हे नाव कुठल्याही धर्माशी संबधित नाही, असे रघु म्हणाला.

 रघु राम व नताली 2011 पासून एकमेकांना डेट करत होते. ‘आंखों ही आंखों में’ या गाण्यात नताली व रघु यांनी एकत्र काम केले होते. याचदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 12 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले होते. या लग्नाला केवळ त्यांच्या घरातील जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते.

रघु रामचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न सुगंधा गर्गसोबत झाले होते. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले. सुगंधा ही अभिनेत्री, गायिका असून तिने काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. सुगंधासोबत घटस्फोट झाल्यानंतर काहीच महिन्यात रघुराम आणि नताली यांनी लग्न केले होते. नतालीदेखील प्रसिद्ध गायिका आहे. 

टॅग्स :रघु राम