Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुणीतरी येणार येणार गं! लग्नाच्या ६ वर्षांनी बाबा होणार प्रिन्स, थाटात पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:35 IST

काही दिवसांपूर्वीच प्रिन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नी युविका गरोदर असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. नुकतंच युविकाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला आहे. 

रोडिज, स्प्लिट्सविला, बिग बॉस यांसारख्या रिएलिटी शोमध्ये सहभाग घेऊन प्रिन्स नरुला प्रसिद्धीझोतात आहे. रिएलिटी शोचा स्पर्धक ते परिक्षक असा यशस्वी प्रवास प्रिन्सने केला आहे. आता छोट्या पडद्यावरील हा चॉकलेट बॉय एका वेगळ्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात करणार आहे. प्रिन्स नरुला लवकरच बाबा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रिन्सने सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नी युविका गरोदर असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. नुकतंच युविकाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला आहे. 

युविकाच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिच्या बेबी शॉवरची झलक पाहायला मिळत आहे. प्रिन्स आणि युविका एन्ट्री घेताना दिसत आहेत. पांढऱ्या रंगाच्या क्यूट ड्रेसमध्ये युविका दिसत आहे. प्रेग्नन्सीमुळे तिच्या चेहऱ्यावरही ग्लो दिसत आहे. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती आणि सुंदर अशा सजावटीमध्ये युविकाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. आईबाबा होणार असल्याचा आनंद प्रिन्स आणि युविकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 

प्रिन्स आणि युविकाने २०१६मध्ये लग्नगाठ बांधली होती. बिग बॉसमध्ये ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. आता लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. त्यांच्या आयुष्यात एका पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी ते दोघेही उत्सुक आहेत. 

टॅग्स :प्रिन्स नरूलाटिव्ही कलाकारसेलिब्रिटी