Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयत्या वेळी सर्वांनी माघार घेतली... 'वेड' सिनेमावेळी रितेश देशमुखने केला अडचणींचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 10:51 IST

'वेड' सिनेमा बनवताना पाठिंबा देणारं कोणीच नव्हतं असा खुलासा रितेशने केला आहे.

2022 साली आलेल्या रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' (Ved) सिनेमाने इतिहास रचला. मराठी सिनेमांच्या इतिहासात 'वेड' ने बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली. रितेश-जिनिलियाची जोडी, रितेशचं दिग्दर्शनात पदार्पण, अप्रतिम गाणी, सुंदर लोकेशन यामुळे सिनेमा सुपरहिट झाला. अगदी बॉलिवूडनेही सिनेमाची दखल घेत रितेशचं कौतुक केलं. मात्र 'वेड' सिनेमा बनवताना पाठिंबा देणारं कोणीच नव्हतं असा खुलासा रितेशने केला आहे.

सिनेमा म्हणलं की त्याची निर्मिती, डिस्ट्रिब्युशन, पोस्ट प्रोडक्शन या गोष्टी असतात. रितेशने 'वेड' सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन दोन्ही केलं होतं. इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला, "जेव्हा वेड बनवत होतो तेव्हा एक अशी वेळ होती जेव्हा काहीच चांगलं होत नव्हतं. अशा वेळी तुम्ही डिजीटल, सेल्स, स्टुडिओसोबत डील्स यांचा आधार घेता. पण आयत्या वेळी त्यांनीही माघार घेतली. आम्ही पुरते अडकलो होतो कारण सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला होता आणि आमच्याकडे ना डिस्ट्रिब्युटर होते ना स्टुडिओ होता. आम्हालाच प्रमोट करावं लागलं, डिस्ट्रिब्युट करावं लागलं. आम्ही ठरवलं ठिके आता हे आहे असं आहे. जाऊन प्रमोट करुया पुढे काय होतं ते बघता येईल. पण नंतर आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो खरंच सुखद धक्का देणारा होता.

तो पुढे म्हणाला, "वेड रिलीजनंतर दुसऱ्या आठवड्यात मला आठवतंय शनिवारी एका थिएटरवाल्याने फोन केला. तो म्हणाला सर रात्री ९ चा शो सुरु आहे. १२.३० ला संपेल. पण लोक थिएटरबाहेर आहेत. रात्री दुसरा शो सुरु करा असं म्हणत आहेत.  मी म्हणलं जर लोक आहेत तर लेट नाईट शोही सुरु करा. मला माझ्या करिअरमध्ये कधीच असा अनुभव आला नव्हता."

टॅग्स :रितेश देशमुखवेड चित्रपटमराठी अभिनेता