Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश देशमुखच्या 'माऊली' या चित्रपटातील पहिले गाणे ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:01 IST

आता 'माऊली' या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे गाणे रितेश देशमुखने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे.

ठळक मुद्देआजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! असे रितेशने फेसबुक पोस्ट सोबत लिहिले आहे. या पोस्टसोबत रितेशने सैयामी खैर, जेनेलिया डिसोजा देशमुख, सिद्धार्थ रामचंद्र, अजय-अतुल, गुरू ठाकूर, आदित्य सरपोतदार यांना टॅग केले आहे. हे गाणे रितेशने शेअर केल्यानंतर केवळ दहा मिनिटांच्या आता या गाण्याला सहाशेहून अधिक लाइक्स आले असून ८५ हून अधिक लोकांनी हे गाणे शेअर केले आहे. हे गाणे अप्रतिम असल्याचे लोक प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत. 

'लय भारी' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'माऊली'. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानने ट्विटर अकाऊंवरून शेअर केला होता. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि संवाद ऐकायला मिळाले आहेत. या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात रितेशसोबत ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री सैयामी खैर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

आता या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे गाणे रितेश देशमुखने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! या पोस्टसोबत रितेशने सैयामी खैर, जेनेलिया डिसोजा देशमुख, सिद्धार्थ रामचंद्र, अजय-अतुल, गुरू ठाकूर, आदित्य सरपोतदार यांना टॅग केले आहे. हे गाणे रितेशने शेअर केल्यानंतर केवळ दहा मिनिटांच्या आता या गाण्याला सहाशेहून अधिक लाइक्स आले असून ८५ हून अधिक लोकांनी हे गाणे शेअर केले आहे. हे गाणे अप्रतिम असल्याचे लोक प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत. 

 

माऊली या चित्रपटाच्या जवळपास दीड मिनिटाच्या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद आहेत. ‘आपले नाव ऐकले नाय, असे एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडले तर माऊली आपले नाव नाही,’ या संवादाने रितेशची एण्ट्री होते. शाहरुखने रितेशच्या या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यामागचे कारण म्हणजे त्याच्या झिरो या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्यासाठी रितेशने माऊलीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. त्यावेळीसुद्धा शाहरुखने ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहित रितेशचे आभार मानले होते. 

'माऊली' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे तर निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे. या चित्रपटाला अजय-अतुलच्या संगीताची साथ  मिळाली आहे.  १४ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माऊली चित्रपटातील पोलीस अधिकारी रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :माऊलीरितेश देशमुखसंयमी खेर