Join us

Ved Marathi Movie:'वेड'ला उदंड प्रतिसाद !, रितेश देशमुख भारावून गेला, म्हणाला- मी ऋणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 19:42 IST

Ved box office collection Day 31 : अभिनेता रितेश देशमुखचा 'वेड' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Ved box office collection Day 31 : अभिनेता रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh ) यांच्या 'वेड'ने  बाॅलिवूड चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. साऊथच्या सिनेमाचा रिमेक असला तरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. इतका की, चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. परिणामी पहिल्या तीन आठवड्यातच या सिनेमानं ५० कोटींचा गल्ला जमवला. रितेश-जिनिलिया(Genelia D'souza-Deshmukh)च्या या चित्रपटाचं ३१ दिवसांचे कलेक्शन 70 कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

रितेशने नुकतीच या दमदार कमाईबाबत पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. रितेश वेडचं यशपाहून भारावून गेला आहे. त्याने तीन शब्दात प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. भारावून, कृतज्ञ, ऋणी असे कॅप्शन त्याने या पोस्टसोबत दिलं आहे. सध्या थिएटरमध्ये वेडचा पाचवा आठवडा सुरू आहे. 

'वेड' ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली. चौथ्या आठवड्यात 'वेड'ची कमाई ५५.२२ कोटींवर पोहोचली होती. आता पाचव्या आठवड्यात ही कमाई जवळपास ७० कोटींवर गेली.

'वेड' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. याशिवाय रितेश-जिनिलियाचे राज्याबाहेरही चाहतेही त्यांचे कौतुक करत आहेत. या कलाकारांच्या सोशल मीडियावर कमेंट करत त्यांची प्रशंसा होताना दिसते आहे.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा