Join us

Rinku Rajguru New Car: रिंकू राजगुरुने खरेदी केली नवीकोरी कार, सोशल मीडियावर दाखवली झलक; किंमत माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 21:16 IST

Rinku Rajguru New Car: रिंकूने स्वकमाईतून खरेदी केली कार; होतंय कौतुक

'सैराट' सिनेमामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सोशल मीडियावर चर्चेत असते. रिंकूने खूप कमी वयात फिल्म इंडस्ट्रीत यश मिळवलं. तिच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. आता रिंकूने मेहनतीच्या जोरावर आणखी एक काम केलं आहे. रिंकूने तिची पहिलीच कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने याची झलक दाखवली.

संपूर्ण महाराष्ट्रात आर्ची नावानेच ओळख असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुने आज सर्वांना अभिमान वाटावा असंच काम केलं आहे. रिंकूने मेहनतीच्या जोरावर तिच्या कमाईतून पहिली कार खरेदी केली आहे. Tata Harrier कार तिने घरी आणली आहे. आयुष्यातली ही तिची पहिलीच कार असल्याने वेगळाच आनंदही आहे. रिंकूने कारसोबत फोटो शेअर करत लिहिले, "पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात. जेव्हा तुम्ही तुमची हक्काची पहिली कार खरेदी करता ती भावना काही औरच असत. तर हे माझं नवं प्रेम!"

रिंकूच्या या लक्झरियस कारची किंमत १० लाखांपेक्षाही जास्त आहे. पांढरा शर्ट, काळी पँट, पांढरे शूज आणि डोक्यावर हॅट या लूकमध्ये तिने कारसोबत छान फोटोशूट केलंय. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत रिंकूचं अभिनंदन केलं आहे. 

रिंकूचा 'झिम्मा 2' सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. यातील तिच्या आणि निर्मिती सावंत या सासू सूनेच्या जोडीचं खूप कौतुक झालं. रिंकूने सिनेमा उत्तम अभिनय केला. आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी अभिनेताकारसोशल मीडिया