शकीला बायोपिकमधील रिचा चड्ढाचा आणखीन एक लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 15:00 IST
साऊथच्या अॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या बायोपिकमधील आणखीन एक लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
शकीला बायोपिकमधील रिचा चड्ढाचा आणखीन एक लूक आला समोर
ठळक मुद्देशकीला बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत रिचा चड्ढाशकीला बायोपिकमध्ये स्वतः शकीलादेखील करणार केमिओ
साऊथच्या अॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या जीवनावर आधारीत बायोपिक येत असून यात तिच्या भूमिकेत अभिनेत्री रिचा चड्ढा दिसणार आहे. या चित्रपटातील रिचाचा लूक समोर आला होता. त्यानंतर आता या सिनेमातील तिचा आणखीन एक लूक समोर आला आहे. त्यात रिचाने खूप सारे दागिने परिधान केले आहेत.
शकीलाची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांबद्दल रिचाने सांगितले की, मी शकीला बायोपिकमध्ये काम करताना खूप एन्जॉय केले आहे. हा सिनेमा मी आतापर्यंत केलेल्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. त्यांच्या जीवनात आलेले चढउतार सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहेत. ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, त्या सर्व गोष्टींचा समावेश सिनेमात करण्यात आला आहे. सर्व गोष्टी लपवून चित्रपट बनवण्यात काय अर्थ आहे. या चित्रपटात शकीला देखील दिसणार आहेत. त्या केमिओ करणार आहेत. दिग्दर्शक लंकेशने नंतर शकीला यांना चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.
बायोपिकबद्दल दिग्दर्शक लंकेश म्हणाला की, मला आधीपासूनच शकीलावर चित्रपट बनवायचा होता. मी शकीलाच्या ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन व्यक्तीमत्त्वामुळे मी खूप प्रभावित झालो होतो.शकीला केरळच्या असून त्यांनी तमीळ, तेलगू, मल्याळम व कन्नड यांसारख्या भाषेतील बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. शकीला यांच्या बायोपिकमध्ये त्यांनी सिनेइंडस्ट्रीत करियरला सुरूवात केल्यापासून आतापर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. एका मुलाखतीत शकीलाने सांगितले की, त्यांना सहा भाऊ-बहिण आहेत.कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून तिच्या आई वडिलांनी कुटुंबाची जबाबदारी शकीलावर टाकली. वयाच्या बावीस-तेवीसाव्या वर्षी शकीलाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. पहिला चित्रपट प्लेगर्ल्समध्ये त्यांनी सिल्क स्मिताच्या बहिणीची भूमिका केली होती.एक काळ असा आला त्यावेळी त्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या. साऊथचे निर्माते त्यांच्यावर अवलंबून होते. निर्मात्यांचा शकीलावर खूप विश्वास होता.