Join us

रिचा चड्ढाचा पायल घोष आणि कमाल आर खानला दणका, दोघांच्या अडचणी वाढणार...

By अमित इंगोले | Updated: October 6, 2020 12:19 IST

आपल्या याचिकेत रिचा चड्ढा म्हणाली की पायल घोषने आणि इतरांनी जबरदस्ती एका तिसऱ्या व्यक्तीवर(अनुराग कश्यप) लावलेल्या आरोप तिचं नाव ओढलं होतं.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने सोमवारी बॉम्बे हायकोर्टमध्ये अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष, कमाल आर खान आणि एका न्यूज चॅनलवर मानहानीचा दावा ठोकला आहे. पायल घोषने एका मुलाखती दरम्यान रिचा चड्ढाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.

आपल्या याचिकेत रिचा चड्ढा म्हणाली की पायल घोषने आणि इतरांनी जबरदस्ती एका तिसऱ्या व्यक्तीवर(अनुराग कश्यप) लावलेल्या आरोप तिचं नाव ओढलं होतं. ती म्हणाली की, पायल घोष आणि इतरांनी केलेले सर्व आरोप खोटे, निराधार आहेत. हे आरोप तिच्या नावाची बदनामी करण्यासाठी लावण्यात आले आहेत. (तनुश्री दत्ताने पायल घोषच्या अनुरागवरील आरोपांवर सोडलं मौन, म्हणाली -)

दरम्यान, पायल घोषने अनुराग कश्यपवर आरोप लावला आहे की, ऑगस्ट २०१३ मध्ये त्याने पायलला घरी बोलवललं आणि लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मीडियासोबत बोलताना पायलने हाच आरोप लावला आहे की, अनुराग कश्यप कथितपणे म्हणाला होता की, रिचा चड्ढा, हुमा कुरेशी आणि माही गिलसारख्या अभिनेत्री त्याला 'सेक्शुअल फेवर' देतात. (अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -)

बॉम्बे हायकोर्टत रिचा चड्ढाच्या प्रकरणाची सुनावणी जस्टिस अनिल मेनन हे करत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आलेल्या या सुनावणीत रिचाकडून तिचे वकील वीरेंद्र तुळजापूरकर आणि सवीना बेदी उपस्थित होत्या. तर पायल घोषकडून कुणीही वकील उपस्थित नव्हते. हायकोर्टाने रिचा चड्ढाला दुसऱ्या पक्षाला ईमेलच्या माध्यमातून नोटीस पाठवून ६ ऑक्टोबरला शपथ पत्र देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे. 

टॅग्स :रिचा चड्डापायल घोषअनुराग कश्यपबॉलिवूडलैंगिक छळ