Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया शर्माने तयार केले 'या' सहकलाकारवर रॅप तयार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 16:28 IST

या मालिकेत नायिका मिष्टीची भूमिका अभिनेत्री रिया शर्मा साकारीत असून यात ती आजवर कधी न पाहिलेल्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे.

ठळक मुद्दे  रिया साकारत असलेली मिष्टीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे

'स्टार प्लस’वर अलीकडेच सुरू झालेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत नायिका मिष्टीची भूमिका अभिनेत्री रिया शर्मा साकारीत असून यात ती आजवर कधी न पाहिलेल्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे.  रिया साकारत असलेली मिष्टीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पण ती एक उत्तम रॅप गीतकारही आहे, याची फारशी कुणाला कल्पना नाही. तिने अलीकडेच आपला सहकलाकार शाहीर शेख याच्यावर एक रॅप रचले होते.

खऱ्या आयुष्यात रिया ही एक उत्तम रॅप गीतकार आहे, ही गोष्ट फारशी कोणाला ठाऊक नाही. ती बरेचदा सेटवर उत्स्फूर्तपणे रॅप गाणी गाताना दिसते. तिचा सहकलाकार शाहीर शेखबरोबर अनेकदा तिला रॅप गीते गाण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. रियाने शाहीर शेखवर  एक रॅप केले आहे आणि ते संपूर्ण कर्मचारी आणि कलाकारांसमोर गायलं. रियाचे रॅप ऐकून शाहीर भारावून गेला आणि त्याने तिचे आभार मानले.

ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेली ही मालिका तिच्या कथानकाला वेगळ्या वळणावर नेण्याचे काम ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेतील पुढील पिढीचे नायक करतील. त्यातून विवाह, नातेसंबंध आणि कौटुंबिक बंध यांवर नवा प्रकाश टाकण्यात येतोय.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस