Join us

पावसामुळे रेणुका शहाणेवर आली चालत जायची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 16:53 IST

पावसामुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींना देखील फटका बसला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणेनेच याबाबत फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितले आहे.

ठळक मुद्देपाण्यातून चालत असतानाचा रेणुकाने तिचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत तिने लिहिले आहे की, मी सुरक्षितपणे माझ्या घरी पोहोचले. मी माझ्या कामासाठी घराच्या बाहेर निघाले होते. पण गुडघ्याइतके पाणी असल्याने माझी गाडी पाण्यातच अडकली.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून मुंबईत तर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईतील अनेक भागात रेल्वे सेवा ठप्प झाली आहे तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. 

 

पावसामुळे सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटींना देखील फटका बसला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणेनेच याबाबत फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितले आहे. पाण्यातून चालत असतानाचा रेणुकाने तिचा फोटो पोस्ट केला असून त्यासोबत तिने लिहिले आहे की, मी सुरक्षितपणे माझ्या घरी पोहोचले. मी माझ्या कामासाठी घराच्या बाहेर निघाले होते. पण गुडघ्याइतके पाणी असल्याने माझी गाडी पाण्यातच अडकली. त्यामुळे मला चालतच जावे लागले. मी सगळ्या मुंबईकरांना आव्हान करत आहे की, तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहा... गरज असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका... अनेक लहान मुले शाळेच्या बसमध्ये अडकली आहेत... गाड्या बंद पडत आहेत... सगळेच चित्र अतिशय भयावह आहे. 

रेणुका प्रमाणे जितेंद्र जोशी, तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकर या सेलिब्रेटींना देखील पावसामुळे आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब लागला आहे. जितेंद्र जेव्हीआरच्या वाहतूक कोंडीत अडकला असल्याचे त्यानेच ट्विटरद्वारे सांगितले आहे. त्याने ट्वीट केले आहे की, पवई ते जेव्हीएलआर हे केवळ पाच किमीचे अंतर पार करायला मला तीन तास लागले. गाड्या मुंगीच्या गतीने पुढे जात आहेत. 

तेजश्री प्रधान ठाण्याहून पवईला शुटिंगसाठी जाताना वाहतूक कोंडीत अडकली आहे तर अभिजीत देखील ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीत अडकला आहे. आज पावसामुळे इंडस्ट्रीतील अनेक इव्हेंट तर अनेक चित्रीकरण रद्द करण्यात आले आहेत. 

टॅग्स :रेणुका शहाणे