Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्याचा नकार ऐकला अन् रेखा अनवाणी धावत सुटली..., तो दिवस त्या नात्याची अखेर ठरला...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 08:00 IST

Happy Birthday Rekha: बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा हिचा आज वाढदिवस. रेखाच्या सौंदर्यावर आजही चाहते फिदा आहे. चित्रपटांमुळे ती चर्चेत होतीच. पण त्यापेक्षा तिच्या खासगी आयुष्याची चर्चा झाली.

ठळक मुद्देरेखाने राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्याची कधीच कबुली दिली नाही. पण राज बब्बर यांनी मात्र एका मुलाखतीत या नात्याची कबुली दिली होती.

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) हिचा आज वाढदिवस. रेखाच्या सौंदर्यावर आजही चाहते फिदा आहे. चित्रपटांमुळे ती चर्चेत होतीच. पण त्यापेक्षा तिच्या खासगी आयुष्याची चर्चा झाली. इतकी की, अनेकांसोबत तिचं नाव जोडलं गेलं. अमिताभ बच्चन व विनोद मेहरा ही दोन नावं अख्ख्या जगाला ठाऊक आहेत. पण यातलंच एक नाव राज बब्बर (Raj Babbar) यांचंही होतं.राज बब्बर यांची पत्नी स्मिता पाटील अकाली गेली आणि रेखा व राज बब्बर अचानक जवळ आले...आणि एका नव्या लव्हस्टोरीची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली.  ही लव्हस्टोरी होती राज बब्बर आणि रेखाची.

होय, 1986 साली स्मिताच्या निधनानंतर राज बब्बर कोलमडले होते. मनातून खचले होते. नेमक्या याचवेळी रेखा  अमिताभ बच्चन यांच्यापासून दुरावली होती.  याच काळात राज बब्बर व रेखा एकमेकांच्या जवळ आलेत, असं मानलं जातं. आयुष्यातील एकाकीपणानं दोघांना एकत्र आणलं होतं..

रेखा आणि राज बब्बर यांच्या लव्हस्टोरी जगापुढे आली नाही. तिची फार चर्चाही झाली नाही. पण असं म्हणतात की, रेखा राज बब्बर यांच्याशी लग्न करू इच्छित होती. पण राज बब्बर  या नात्याला नाव देण्यास तयार नव्हते.  राज बब्बर यांना आपल्या पहिल्या पत्नीकडे म्हणजेच नादिराकडे परत जायचं होतं.  एके दिवशी राज यांनी रेखाला ही गोष्ट सांगितली आणि रेखा बिथरली. दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, रेखा राज यांना सोडून अनवाणी पायांनी चालत सुटली. रेखानं असं काही घडल्याचा इन्कार केला होता. पण तिला अनवाणी पायांनी रस्त्यावरून धावणारे काही लोक होते.  असं म्हणतात की हा दिवस त्यांच्या नात्याचा शेवट होता.  

रेखाने राज बब्बर यांच्यासोबतच्या नात्याची कधीच कबुली दिली नाही. पण राज बब्बर यांनी मात्र एका मुलाखतीत या नात्याची कबुली दिली होती.‘आम्ही एकत्र काम करत होतो आणि एकमेकांना खूप चांगले ओळखायचो. परिस्थितीमुळे आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. मात्र एका काळानंतर रेखा स्वत:च या नात्यातून बाहेर पडली. मी सुद्धा रेखासोबत इतका  कनेक्टेड नव्हतो जितका स्मिता सोबत होतो. आमच्यात ती इंटेन्सिटी नव्हती. मात्र आम्ही फक्त मित्र होतो, असं मी म्हणणार नाही, असं राज बब्बर त्या मुलाखतीत म्हणाले होते.   

टॅग्स :रेखाराज बब्बरबॉलिवूड