Join us
Daily Top 2Weekly Top 5

..आणि 'या' कारणामुळे निराश होऊन रडू लागली चित्रांगदा सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 06:30 IST

'साहेब, बीवी और गँगस्टर3’ सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली फारशी काही कमाल दाखवू शकलेला नाही. यातच आशी चित्रांगदाच्या भूमिकेला घेऊन एक नवी चर्चा सुरू झाली आहे

ठळक मुद्दे 'साहेब, बीवी और गँगस्टर3’ पाहताना निराश होऊन चित्रांगदा रडू लागली. चित्रागंदाचे अनेक सीन्स कट करण्यात आले आहे

'साहेब, बीवी और गँगस्टर3’ सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली फारशी काही कमाल दाखवू शकलेला नाही. यातच अशी चित्रांगदाच्या भूमिकेला घेऊन एक नवी चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रांगदाच्या भूमिकेशी छेड-छाडा करण्यात आली आहे आणि हे बघून ती काहीशी नाराज झाली आहे. 

चित्रांगदाची तक्रार आहे की तिने शूट केलेल्या सगळ्या गोष्टी सिनेमात दाखवण्यात आलेल्या नाही. अनेक ठिकाणी तिचे सीन्स कट करण्यात आले आहेत. ऐवढेच नाही तर सिनेमा तिने जो मुजरा केला आहे तो देखील कट करण्यात आला आहे. या गोष्टीवरुन निराश झालेल्या चित्रांगदाला संपूर्ण टीमसोबत 'साहेब, बीवी और गँगस्टर3’ पाहताना निराश होऊन रडू लागली. रिपोर्टनुसार दिग्दर्शक तिग्मांशु धूलियाने संपूर्ण लक्ष्य माही गिलच्या भूमिकेवर दिले आहे. माही आणि चित्रांगदा दोघीही संजय दत्तच्या अभिनेत्री असतात.  

 सिनेमाबाबत बोलायचे झाले तर पहिल्या दोन पार्टच्या तुलनेत तिसऱ्या भागाला फारसे काही यश मिळाले नाही. ‘संजू’ या बायोपिकनंतर संजयचा रिलीज होणारा हा पहिला चित्रपट होता. त्यामुळे ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’कडून मेकर्सला बऱ्याच अपेक्षा होत्या. या चित्रपटाच्या पहिले दोन पार्ट हिट होते. त्यामुळे तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले, अशी आशा होती. पण प्रत्यक्षात हा चित्रपट आपली लागतही काढू शकला नाही. या चित्रपटाचा एकूण बजेट २५ कोटी होता. पण पहिल्या आठवड्यात या सिनेमाने केवळ ७.५ कोटी कमावले

टॅग्स :संजय दत्तचित्रांगदा सिंग