Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून काजोलच्या मुलीला तिचे सिनेमे बघणं आवडत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 16:14 IST

येत्या 22 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच काजोलची मुलंही हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहेत. 

मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या डेडपूल सिनेमासाठी रणवीर सिंगने आपला आवाज दिल्याने त्याच्या चाहत्यांना मेजवानीच मिळाली. आता यावेळ काजोल तिच्या आवाजामुळे चर्चेत आली आहे. 'इन्क्रेडिबल 2' या सिनेमातील हेलन पर या भूमिकेला काजोलने आवाज दिलाय. येत्या 22 तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय. सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच काजोलची मुलंही हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक आहेत. 

काजोल आता भलेही बॉलिवूड सिनेमांपासून दूर असली तरी तिचा चाहतावर्ग आजही कमी नाहीये. काजोलच्या कामाचं आजही कौतुक केलं जातं. पण काजोलची मुलं कोजलचे सिनेमे बघतात का? किंवा ते बघितल्यावर त्यांचं काय रिअॅक्शन असतं याबाबत काजोलनेच खुलासा केलाय. काजोलला एक मुलगी न्यासा आणि एक मुलगा युग आहे. 

एका इव्हेंटमध्ये काजोलने खुलासा केलाय की, तिची मुलं अजिबात तिचे सिनेमे बघण्यासाठी अजिबात उत्सुक नसतात. त्यांना अजिबात माझे सिनेमे आवडत नाहीत. याच कारणही काजोलने यावेळी सांगितलं. 

काजोलच्या मुलांना तिचे सिनेमे आवडत नाहीत याचं कारण सांगताना ती म्हणाली की, न्यासाला असं वाटतं की, तिची आई नेहमी सॅड सिनेमेच करते. आणि न्यासाला कधीही सॅड सिनेमे बघायला आवडत नाही.  

टॅग्स :काजोलबॉलिवूड