Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून कानाला खडाच्या मंचावर भावुक झाली अनिता दाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 08:00 IST

संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी प्रेक्षकांची आवडती राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे

ठळक मुद्दे'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमधून अनिता दाते घराघरात पोहोचली कानाला खडाच्या मंचावर येऊन अनिताने मनमोकळ्या गप्पा मारल्या

संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसंच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांमुळे रंगणाऱ्या या मैफिलीने तो तितकाच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडला. 

येत्या भागात संजय मोने यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी प्रेक्षकांची आवडती राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते कानाला खडाच्या मंचावर सज्ज होणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अनिता ही प्रेक्षकांमधलीच एक होऊन गेली आहे.

अनिताच्या राधिका या व्यक्तिरेखेची लोकप्रियता इतकी आहे कि मालिकेतील राधिकेच्या समस्यादेखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. कानाला खडाच्या मंचावर येऊन अनिताने मनमोकळ्या गप्पा मारल्या. नाशिकवरून मुंबईत आलेल्या अनिताच्या अभिनय कारकिर्दीतील प्रवास आणि इतक्या वर्षात तिच्यात कलाकार तसंच माणूस म्हणून झालेले बदल यासगळ्यांबद्दल बोलताना अनिता भावुक झाली. कधी कधी आपण नकळतपणे लोकांना दुखावतो आणि म्हणूनच त्या भावना व्यक्त करताना अनिताच्या पापण्या ओलावल्या. 

टॅग्स :अनिता दातेकानाला खडामाझ्या नवऱ्याची बायको