Join us
Daily Top 2Weekly Top 5

10 वर्षांनी लहान गायकाला प्रियंका चोप्रा करतीये डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:41 IST

एका अमेरिकन गायकासोबत तिचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर ही चर्चा होऊ लागली आहे. 

मुंबई : बॉलिवूडसोबतच हॉलिवू़डमध्ये आपल्या अदाकारीने सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आली आहे. एका अमेरिकन गायकासोबत तिचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर ही चर्चा होऊ लागली आहे. 

प्रियंका चोप्रा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड नामांकन मिळालेला गायक, अभिनेता निक जॉनस याला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. 

हॉलिवूड सीरिज क्वॉंटिकोच्या माध्यमातून प्रियंकाने हॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता ती चांगली रुळली असून अनेकदा तिला गायक निक जॉनससोबत बघण्यात आले आहे. दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे याचा जरी काही अधिकृत खुलासा दोघांनीही केला नसला तरी ते ज्याप्रकारे एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत, त्यावरुन त्यांचं अफेअर असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. 

 

आधी लॉस एंजेलिसमध्ये बेसबॉल मॅचवेळी दोघे सोबत दिसले. त्यानंतर ते कॅलिफोर्नियामध्ये एका बोटमध्ये पार्टी करताना दिसले. यावेळी या दोघांची जवळीक बघायला मिळाली. हे सगळे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघे मॅट गाला रेड कार्पेटवरही एकत्र आले होते. 

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड