Saleel Kulkarni om Smriti Mandhana Jemimah Rodrigues Friendship : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम लढतीत स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्स राखून पराभव करत स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. जेमिमा रॉड्रिग्सच्या दिल्ली कॅपिटल्स संघाची फायनलमधील पराभवाची मालिका कायम राहिली. या सामान्याकडे सर्वांचं लक्ष होतं. कारण, दोन जिवलग मैत्रिणी आमने-सामने होत्या. प्रसिद्ध मराठी गायक सलील कुलकर्णी यांनी स्मृती आणि जेमिमा यांच्यातील अतूट मैत्रीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
स्मृतीच्या आयुष्यातील कठीण काळाची आठवण करून देताना सलील कुलकर्णी यांनी लिहलं, "स्मृती आणि जेमिमा… मैत्री... खेळ… आधार! दोघींनी भारताकडून वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. आता त्या WPL च्या फायनलमध्ये एकमेकींविरुद्ध जीव तोडून लढल्या. स्मृतीच्या आयुष्यात वादळ आलं, तेव्हा जेमिमा ऑस्ट्रेलियाची लीग सोडून मैत्रिणीसाठी सांगलीत तिच्याबरोबर थांबली होती. आता स्मृती बाद झाल्यावर कदाचित DC जिंकू शकते, या आशेने जेमी आनंदून नाचली".
पुढे त्यांनी लिहलं, "स्मृतीने आयुष्यातल्या सगळ्या वादळातून बाहेर येऊन या स्पर्धेत सर्वात जास्त धावा केल्या आणि RCB ने Cup जिंकला. त्या दोघी पुन्हा मैत्रिणी म्हणून जवळ आल्या. म्हणजे चांगली माणसं अजून आहेत. आधार देणारी, एकमेकांशी स्पर्धा करून सुद्धा मैत्री जपणारी. छान वाटलं… सतत... घणाघात… टोला... पर्दाफाश… फसवणूक.. हे वाचून... ऐकून... ट्रॅफिक जॅममध्ये जीव अडकला होता… तो सुटला… मनाला…चांगले काहीतरी वाटलं!".
Web Summary : Saleel Kulkarni's post highlights the bond between Smriti Mandhana and Jemimah Rodrigues. Despite fierce competition in the WPL final, their friendship remains strong. Kulkarni recalls Jemimah's support during Smriti's difficult times and celebrates their enduring connection, proving that genuine relationships can thrive even amidst rivalry.
Web Summary : सलील कुलकर्णी के पोस्ट में स्मृति मंधाना और जेमिमा रोड्रिग्स के बीच बंधन को दर्शाया गया है। डब्ल्यूपीएल फाइनल में कड़ी प्रतिस्पर्धा के बावजूद, उनकी दोस्ती मजबूत है। कुलकर्णी ने स्मृति के कठिन समय के दौरान जेमिमा के समर्थन को याद किया और उनके स्थायी संबंध का जश्न मनाया, यह साबित करते हुए कि प्रतिद्वंद्विता के बीच भी वास्तविक रिश्ते पनप सकते हैं।