Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांना माहीत नाही साऊथचा खिलाडी Ravi Teja चं खरं नाव? रातोरात बदललं होतं त्याचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 13:21 IST

Happy Birthday Ravi Teja : आपल्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने तो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आला आहे. रवि कोणत्याही फिल्मी बॅकग्राउंडमधून आलेला नाही.

Happy Birthday Ravi Teja : साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता रवि तेजा (Ravi Teja) याचा आज वाढदिवस. तो टॉलिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून एकापेक्षा एक हिट सिनेमे देत आहे. आपल्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने तो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आला आहे. रवि कोणत्याही फिल्मी बॅकग्राउंडमधून आलेला नाही. त्यामुळे त्याला सुरूवातीला खूप स्ट्रगल करावा लागला. अनेकांना माहीत नसेल, त्याने असोसिएट डिरेक्टरपासून ते सपोर्टिंग आर्टिस्टपर्यंतची कामं केली. तो भलेही रवि तेजा नावाने प्रसिद्ध असेल, पण त्याचं खरं नाव कमीच लोकांना माहीत आहे. चला जाणून घेऊ त्याच्या काही खास गोष्टी.

आंध्र प्रदेशच्या जग्गमपेटामध्ये जन्मलेल्या रवि तेजाचं पूर्ण नाव विशंकर राजू भूपतिराजू आहे. त्याला साऊथमध्ये 'मास महाराजा' आणि खिलाडी नावाने ओळखलं जातं. इतकंच नाही तर त्याच्या सिनेमात अ‍ॅक्शन सीन्स जास्त असल्याने त्याला साऊथचा अक्षय कुमारही म्हटलं जातं.

रविने त्याच्या फिल्मी करिअरच्या सुरूवातीला सपोर्टिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं. त्याचा पहिला सिनेमा १९९० मध्ये आला होता. 'कर्तव्यम' या सिनेमातून त्याने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत हिरो म्हणून डेब्यू केलं होतं. या सिनेमानंतर त्याला काम मिळणं बंद झालं होतं. त्याला केवळ छोट्या छोट्या भूमिका मिळत होत्या. त्यानंतर त्याची भेट १९९६ मध्ये कृष्णा वाम्सीसोबत झाली. इथून त्याचा असिस्टंट डिरेक्टरचा प्रवास सुरू झाला होता. त्याने 'नेने पल्लदुथा'मसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं होतं. तसेच यात छोटासा रोलही केला होता.

या सिनेमातील त्याचा रोल भलेही छोटा होता, पण दिग्दर्शक वाम्सीवर छाप सोडली होती. वाम्सी यांना त्याचं काम खूप आवडलं होतं. या सिनेमाला तेलुगूच्या बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर रवि असिस्टंट डिरेक्टर म्हणून अनेक सिनेमासाठी काम करू लागला होता. यानंतर त्याचं नशीब बदललं. 'नी कोसम' सिनेमाने त्याचं नशीब बदललं. यात त्याला मुख्य हिरो म्हणून काम मिळालं. यासाठी त्याला नंदी अवॉर्डही मिळाला होता.

नंदी अवॉर्डने सन्मानित केल्यानंतर रवि तेजाला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. यात ‘सिंदूरम’, ‘वेंकी’, ‘डॉन सीनू’, ‘बंगाल टाइगर’, ‘राजा द ग्रेट’, ‘बालुपु’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्याच्या अनेक सिनेमांचे हिंदीत रिमेकही बनले. जसे की, 'राउडी राठोड' च्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारने काम केलं होतं. तसेच त्याच्या 'किक' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान होता. 

रवि तेजाची फॅन फॉलोइंग साऊथमधेच नाही तर नॉर्थ इंडियातही भरपूर आहे. सध्या त्याच्या 'खिलाडी' या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचा हा सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रवि तेजा हिंदीत डेब्यू करणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हा सिनेमा ११ फेब्रुवारीला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी