Join us

'तुला पाहते रे २' येणार प्रेक्षकांच्या भेटीला?, रवी जाधवने दिले हे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 13:18 IST

'तुला पाहते रे' या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी निरोप घेतला असला तरीदेखील या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. वाहिनीनं अधिकृत कुठेही सांगितलं नाही. मात्र रवी जाधवच्या इंस्टाग्राम पोस्टवरून या चर्चेला उधाण आलं आहे. 

रवी जाधव यांनी गायत्री दातारसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, तुला पाहते रे भाग २. लवकरच येणार. यासोबतच रवी जाधवने सनडेफनडे, जस्ट जोकिंग व शूटिंग असे हॅशटॅग टाकले आहेत. 

आता हॅशटॅग वरून तर स्पष्ट झालं की तुला पाहते रेचा दुसरा भाग येत नाही आहे. मात्र गायत्री दातार व रवी जाधव कोणत्या तरी प्रोजेक्टवर एकत्रित काम करत आहेत. ते कोणतं ते लवकरच समजेल. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रवी जाधव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवा चित्रपट घेऊन लवकरच येणार आहे. अद्याप याबद्दल कोणताच खुलासा केलेला नाही.

तर गायत्री दातारच्या कामाबद्दल सांगायचं तर ‘तुला पाहते रे’ या मालिकेनं निरोप घेतल्यानंतर आता गायत्री प्रथमच निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे.या नाटकात ती शहजादीच्या भूमिका साकारते आहे. याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे. 

 या चित्रपटाबद्दल गायत्री दातारने मराठी बॉक्स ऑफिस या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''कोल्हापूर डायरीज' या चित्रपटामध्ये मी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मुलीचे पात्र साकारले आहे. ती इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे.'

टॅग्स :तुला पाहते रेरवी जाधवगायत्री दातार