दिग्दर्शक नितेश तिवारीं(Nitesh Tiwari)चा 'रामायण' (Ramayana Movie) हा बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. टीव्ही स्टार रवी दुबे (Ravi Dubey) आगामी चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत रवीने आता यावर मौन सोडले आहे.
रवी दुबेला जमाई राजा आणि सास बिना ससुराल या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. कनेक्ट सिनेला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, रवी दुबेने कबूल केले की तो खरोखरच हा प्रोजेक्ट करत आहे आणि म्हणाला, "माझ्या निर्मात्यांच्या परवानगीने, होय, मी ते करत आहे. मला वाटले की या प्रोजेक्टमध्ये पावित्र्य आहे आणि नितेश सर, नमित सरांनी यासंदर्भात घोषणा करण्यासाठी काही योजना आखल्या असतील. तर मी लोकांसमोर काही चुकीचं बोललो तर ते बरोबर दिसणार नाही. परंतु 'नाही' म्हणणे फारच चुकीचे ठरेल म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि मी त्यांना म्हणालो की हा प्रश्न विचारला तर मी काय सांगू, त्यावर त्यांनी हो सांग म्हटल्यावर मी आता सांगतोय की या सिनेमात मी काम करतो आहे.
असा होता रणबीर कपूरसोबत अनुभवरणबीर कपूरसोबत काम करताना रवी म्हणाला की, रणबीर कपूरसारख्या 'मेगास्टार'सोबत काम करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. त्याच्या गुणांची प्रशंसा करताना रवी म्हणाला, "तो दयाळू, प्रेमळ, शांत आहे आणि सर्वांप्रती असलेला आदर छान आहे. तो खूप मेहनत घेत आहे, पण सेटवर तो असे ढोंग करणार नाही की मी असाच आहे. प्रत्येक वेळी जसा असतो तसाच तो सेटवर असतो. प्रत्येक वेळेला तो कॅमेऱ्यासमोर आहे. तुम्हाला दिसेल की या पिढीतील तो एकमेव प्रोफेशनल कलाकार आहे ज्याला मी भेटलो आहे आणि मी त्याला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानतो आणि प्रेम करतो.”
नितेश तिवारीचा रामायण दोन भागात विभागला गेला आहे, पहिला भाग दिवाळी २०२६ ला रिलीज होईल आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला रिलीज होईल.