Join us

 आमिरपाठोपाठ टीव्ही स्टार रवी दुबेनेही डिलीट केले इन्स्टाग्राम अकाऊंट, हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 14:21 IST

मी पुढील काही दिवस इंस्टाग्राम डिलीट करत आहे...अशा आशयाची पोस्ट रवी दुबेने लिहिली आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी आमिर खानने असेच कारण देत सोशल मीडियाला रामराम ठोकला होता.

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने सोशल मीडियाला रामराम ठोकला. आता आणखी एका अभिनेत्याने सोशल मीडियाला गुडबाय म्हणत, इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले आहे. हा अभिनेता कोण तर टेलिव्हिजन स्टार रवी दुबे. आपल्या करिअरमध्ये अनेक हिट शो देणा-या रवीने त्याच्या बिझी शेड्यूलमुळे स्वत:चे इन्स्टा अकाऊंट डिलीट केले आहे.

 रवी दुबे सध्या ‘जमाई 2.0’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे. सोबत पत्नी सरगुन मेहताच्या ‘उडारियां’च्या प्रॉडक्शनमध्येही तो मदत करतोय. इतकेच नाही तर रवीच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. होय, लवकरच तो ‘मत्स्यकांड’मध्ये दिसणार आहे. या कामामुळे रवी स्वत:साठी व कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नव्हता.  कामावरुन घरी आल्यानंतर तो बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवत होता. यामुळे याच्या कुटुंबीयांसोबत त्याला वेळ घालवता येत नव्हता. त्यामुळे त्याने थेट सोशल मीडियाचा वापरच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो केवळ आपल्या कामावर आणि कुटुंबीयांवरच लक्ष केंद्रित करणार आहे. त्याला त्याची प्रायव्हसी परत हवी आहे आणि त्याची सुरुवात त्याने इन्स्टाग्रामचा वापर थांबवून केली आहे.

तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण ‘जमाई 2.0’च्या टीजरची स्क्रिप्ट रवी दुबेने लिहिली होती आणि टीजरच्या टायटल ट्रॅकमध्ये जो आवाज आहे, तो सुद्धा रवी दुबेचा आहे.

काही दिवसांपूर्वी आमिर खानने असेच कारण देत सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. मी माझ्यात मश्गुल असतो. मी तसाही सोशल मीडियावर नसतोच. म्हणून मी आता याचा वापर पूर्णपणे थांबवला आहे, असे आमिरने स्पष्ट केले होते.   

टॅग्स :रवि दुबे