Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री रविना टंडन आणि राशाने त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 16:53 IST

राशा आणि रवीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एकेकाळी बॉलिवूड राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. 'टीप टीप बसरा पाणी' या गाण्यातील तिच्या घायाळ करणाऱ्या अदा अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहेत.  मोठ्या ब्रेकनंतर रवीनाने सिनेसृष्टीत कमबॅक केले. तर दुसरीकडे तिची लेक राशा थडानीही (Rasha Thadani) फिल्मइंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. मायलेकीचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. रवीना या वयातही अगदी सुंदर आणि फिट दिसते. तर राशाही सौंदर्याबाबतीत आईवरच गेली आहे. नुकतंच दोघींनी त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. 

रवीना टंडनही सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतेच तिने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये  त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिर परिसर पाहायला मिळतोय. यावेळी दोघेही पारंपारीक लूकमध्ये दिसून आल्या. रवीनाने आणि राशाने सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. दर्शन घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर अत्यानंद दिसून येतोय. राशा आणि रवीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी फोटोंवर कमेंट करत माय-लेकीचं कौतुक केलं आहे. 

रवीना आणि राशा अनेक ठिकाणी भेटी देत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोमनाथचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं होतं. तोही व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मायलेकीचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. रविनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ओटीटीवर पदार्पण केलंय. 'कर्मा कॉलिंग' (Karma Calling) या वेबसीरिजमध्ये रवीना इंद्राणी कोठारी या पॉवरफुल महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळाली.  शिवाय ती अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू जंगल' सिनेमातही दिसणार आहे. तर राशा थडानी साऊथ स्टार रामचरण तेजासोबत डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत.

टॅग्स :रवीना टंडनसेलिब्रिटीबॉलिवूड