Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रात्रीस खेळ चाले २'मधल्या वच्छीच्या भन्नाट नागिन डान्स पाहिलात का ?, डान्स पाहून तुम्ही व्हाल तिचे फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 16:32 IST

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

ठळक मुद्देवच्छीचा हा डान्स भल्याभल्यांना थक्क करणार आहे

रात्रीस खेळ चाले २’ मालिका एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसेच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटावी इतक्या सहजपणे संजीवनी ती साकारते.

वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्स देखील तितकाच लोकप्रिय होत आहे. स्वतःच्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील. आता वच्छीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये वच्छी नागिन डान्स करताना दिसतेय. वच्छीचा हा डान्स भल्याभल्यांना थक्क करणार आहे. 

सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वी वच्छीचा मुलगा काशीचे मृत्यू झाला होता. त्या सरिताच्या पोटी जन्म घेऊन परत येणार असल्याची माहिती आहे. खरंच काशीने सरिताच्या पोटी जन्म घेतला असेल का? अण्णा या बाळाच्या जन्माने खुश होतील का? असे अनेक प्रश्न सध्या पडले आहेत.  

टॅग्स :रात्रीस खेळ चालेझी मराठी