Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची ऑफस्क्रीन मजा, पहा तिचा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 12:00 IST

अपूर्वानं साकारलेली शेवंताची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत.

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.

अपूर्वानं साकारलेली शेवंताची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत. तिने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती बुमरँग करताना दिसतेय. तिच्यासोबत या मालिकेतील बालकलाकार सिद्धी माळकरदेखील नाचताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करत अपूर्वानं ऑफस्क्रीन मजा असं लिहिलंय. 

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत तर शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिएलिटी शोमध्ये देखील काम केले आहे.

तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली.

तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे.

तसेच इश्क वाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. 

टॅग्स :रात्रीस खेळ चालेझी मराठी