Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेवंताचा 'रात्रीस खेळ चाले २' मधील नवा लूक पाहिलात का?, पहा तिचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 18:17 IST

‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. सध्या शेवंता एका नव्या लूकमध्ये पाहायला मिळते आहे. या लूकमध्ये शेवंता मॉडर्न दिसते आहे.

अपूर्वा नेमळेकर हिने ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील नवा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेचं कथानक शेवंताच्या अवतीभवती फिरत आहे. तिच्या भूमिकेचे विविध पैलू मालिकेत दाखवले जातात. वेळोवेळी तिच्या लूकमध्येही बदल करण्यात आले. सध्या शेवंता एका नव्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. शेवंताचा हा नवा लूक प्रेक्षकांना भुरळ पाडतो आहे.

'रात्रीस खेळ चाले' मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले २' प्रेक्षकांच्या भेटीस आला.

टॅग्स :रात्रीस खेळ चालेझी मराठी