Join us

कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडामधील कोणते गुण आवडतात? रश्मिकाच्या उत्तराने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:02 IST

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिंदी आणि साऊथ सिनेइंडस्ट्रीत सध्या आघाडीवर आहे. गेल्या काही वर्षात ती अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचा भाग राहिली आहे. 'पुष्पा' सिनेमामुळे तिचं नशीबच पालटलं. नंतर ती 'अॅनिमल', 'छावा','सिकंदर' या सिनेमांमध्ये झळकली. तर सध्या ती आगामी 'कुबेरा' या साऊथ सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने धनुष आणि नागार्जुनसोबत स्क्रीन शेअर केली आहे. सिनेमाच्या इव्हेंटवेळी रश्मिकाला काही साऊथ अभिनेत्यांची  नावं घेत त्यांचे गुण घ्यायला आवडतील असं विचारण्यात आलं. यावेळी तिचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाचंही नाव घेण्यात आलं. तेव्हा ती काय म्हणाली वाचा.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कधी कॉफी डेट तर कधी डिनर डेटचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र दोघांनी आजपर्यंत त्यांचं नातं जाहीर केलं नाही. नुकतंच 'कुबेरा' सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी रश्मिकाला प्रश्न विचारण्यात आला. 'अभिनेत्यांमधल्या कोणत्या चांगल्या गोष्टी कॉपी करायला आवडतील?' यावेळी धनुष, अल्लू अर्जुन, नागार्जुन यांची नावं होती. नंतर विजय देवरकोंडाचंही नाव घेण्यात आलं. त्यावर रश्मिकाच्या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधलं. विजयचं नाव ऐकताच रश्मिका म्हणाली, "सगळं, सगळं घेईन." 

रश्मिकाच्या या उत्तरानंतर सर्वांनी एकच आवाज केला. रश्मिकाला विजयमधलं सगळंच आवडतं. यासोबत तिने अप्रत्यक्षरित्या विजयवरचं प्रेमच कन्फर्म केलं आहे. रश्मिका, धनुष आणि नागार्जुनचा 'कुबेरा' २० जून रोजी प्रदर्शित होत आहे. 

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'गीता गोविंदम'मध्ये एका गाण्यात रश्मिकाने विजयची नक्कल केली होतीय तेव्हापासूनच ती नॅशनल क्रश बनली. विजय आणि रश्मिकाच्या लव्हस्टोरीलाही तिथूनच सुरुवात झाली.

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडाTollywoodरिलेशनशिपसेलिब्रिटीदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट