अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही कायम चर्चेत असते. ओमानमध्ये २९ व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केल्यानंतर रश्मिका मंदान्ना पुन्हा कामावर परतली आहे. रश्मिकानं आयुषमान खुरानासोबत तिच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'थामा'चं शुटिंग सुरू केलं आहे. याची माहिती तिनं सोशल मीडियावद्वारे दिली.
'थामा'चं चित्रपटाचं शुटिंग रात्री होत आहे. रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर रात्रीच्या सुंदर आकाशाची झलक पोस्ट केलीय. ज्यात च्रंद दिसतोय. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "पुढचे काही दिवस रात्रीचं शूटिंग. म्हणजे तुम्हाला फक्त चंद्र, कॅमेरा लाइट किंवा ताऱ्यांच्या पोस्ट दिसतील". 'थामा'हा चित्रपट रोमँटिक असण्यासोबतच हॉरर-कॉमेडी आहे. चित्रपटाची कथा ही एका अपूर्ण प्रेमकथेभोवती फिरणार आहे.
'थामा' सिनेमात रश्मिका-आयुषमानचा मुकाबला वरुण धवनसोबत होणार आहे. वरुण धवन पुन्हा एकदा भेडियाच्या रुपात या सिनेमात दिसणार आहे. वॅम्पायर असलेल्या आयुषमान खुरानाचा वरुण धवनच्या भेडियाशी सामना होणार आहे. त्यामुळे 'स्त्री २'नंतर प्रेक्षकांना 'थामा'च्या निमित्ताने पुन्हा एकदा कलाकारांचा अनोखा संगम बघायला मिळेल, यात शंका नाही. वरुण आणि आयुषमान यांनी एका आलिशान स्टूडियोत या सीनचं शूटिंग केल्याची चर्चा आहे.
रश्मिका आणि आयुषमान खुराना व्यतिरिक्त या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. 'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या', 'स्त्री २' नंतर 'थामा' सिनेमा या हॉरर युनिव्हर्सचा पुढील भाग असणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. आदित्यने याच युनिव्हर्समधील 'मुंज्या' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.