Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद कपूरचा बनावट नोटांचा घोटाळा उघड होणार? राशी खन्नाने केला 'फर्जी 2' बाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 14:16 IST

सीरिजमधील मुख्य अभिनेत्री राशी खन्नाने 'फर्जी 2' बद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी ओटीटीवरील 'फर्जी' (Farzi) या वेबसीरिजला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता. शाहिद कपूरने (Shahid Kapoor)  यातून ओटीटीमध्ये पदार्पण केलं होतं. बनावट नोटांचा व्यापार यावर सीरिज आधारित होती. राज आणि डीके दिग्दर्शित या सीरिजच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. फर्जी 2 (Farzi 2) येणार हे तर नक्की आहे मात्र अद्याप त्याचं शूटिंगही सुरु झालेलं नाही ना कोणतं अपडेट आलं आहे. आता सीरिजमधील मुख्य अभिनेत्री राशी खन्नाने (Rashi Khanna) फर्जी 2 बद्दल एक महत्वाची माहिती दिली आहे.

फर्जी 2 च्या शूटिंग आणि रिलीजवर राशी खन्ना म्हणाली, " सीरिजचं शूट पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सुरु होईल. कारण सध्या राज आणि डीके यांच्याकडे बरेट प्रोजेक्ट आहेत. सिटाडेल, हनी बनी आणि फॅमिली मॅन 3 हे त्यांचे प्रोजेक्ट रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. यानंतर ते फर्जी 2 वर काम करतील."

ती पुढे म्हणाली, "फर्जीमध्ये शाहिद आणि विजय सेतुपति दोघांसोबत काम करायला खूप मजा आली. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. विजय सर खरोखरंच तसेच आहेत जसे ते नेहमी असतात. ते कोणताच दिखावा करत नाहीत. मला त्यांची ही गोष्ट खूप आवडते. शाहीद एक विविधांगी अभिनेता म्हणून प्रभावशाली आहे."

फर्जी वेबसीरिज बनावट नोटा बनवण्याच्या धंद्याभोवती फिरते. शाहिद यामध्ये मास्टर असतो. तर राशी खन्ना ही या नोटा पकडण्यात माहीर असते.  तर विजय सेतुपति पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सीरिजच्या दुसऱ्या भागाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मात्र फर्जी 2 रिलीज व्हायला अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :शाहिद कपूरवेबसीरिजअ‍ॅमेझॉनTollywood