Join us  

‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये रणवीर सिंगच्या ह्या परफॉर्मन्सला मिळाला वन्स मोअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 7:25 PM

स्टार प्लसवरील ‘कानपूरवाले खुराणाज’मधील रणवीर सिंगच्या एका चाहत्यासाठी तो लकी दिवस ठरला.

ठळक मुद्देरणवीरने पूर्ण केली चाहत्याची इच्छा

स्टार प्लसवरील ‘कानपूरवाले खुराणाज’मधील रणवीर सिंगच्या एका चाहत्यासाठी तो लकी दिवस ठरला. रणवीर सिंगच्या प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असलेली गोष्ट या चाहत्याला प्रत्यक्षात करता आली. ‘लहू मूँह लग गया’ या गाण्याच्या तालावर रणवीरने या चाहत्यावर आपण प्रेम करीत असल्याचा अभिनय केला.

‘कानपूरवाले खुराणाज’ या कार्यक्रमाशी संबंधित एका सूत्राने सांगितले, “या कार्यक्रमातील एका मजेदार भागात प्रेक्षकांमधील रणवीर सिंगचा एक चाहता उठला आणि तो व्यासपीठावर आला. त्याने रणवीरला विचारले की ते दोघे आता ‘लहू मूँह लग गया’ गाण्यावर डान्स करू शकतो का? रणवीर हा अतिशय खिलाडू आणि उत्स्फूर्त वृत्तीचा अभिनेता आहे. त्यामुळे त्याने त्याची ही मागणी मान्य केली. रणवीरने या गाण्यावर त्या चाहत्याबरोबर चक्क प्रणय दृश्य साकारले. ते पाहून उपस्थित श्रोत्यांची हसता हसता पुरेवाट झाली आणि त्याला वन्स मोअरही मिळाले.”‘स्टार प्लस’वरील ‘कानपूरवाले खुराणाज’ या नव्या मालिकेत रणवीर सिंग आणि ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी हे पहिले सेलिब्रिटी अतिथी ठरले आहेत. भारतातील सर्वात लाडका विनोदवीर सुनील ग्रोव्हर, नामवंत नृत्यदिग्दर्शिका फरहा खान आणि सूत्रसंचालक अपारशक्ती खुराणा हे या मालिकेत धमाल विनोदाची आतषबाजी करताना दिसणार आहेत.

टॅग्स :रणवीर सिंगकानपुरवाले खुराणाज्