Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. या प्रकरणी समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तर आता अभिनेत्री आणि मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन असलेल्या श्रेया बुगडेनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रणवीर अलाहाबादियाचं वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर श्रेया बुगडेने तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. "कॉमेडीच्या नावाखाली काय सहन करावं लागतंय. आणि हे कशासाठी...तर फक्त काही व्ह्यूजसाठी. दयनीय आणि लज्जास्पद...यांना आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणतो? खरंच? हे निराशाजनक आहे!", असं श्रेयाने म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
समय रैनाच्या 'इंडिया गॉट लेटेंट' शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांविषयी अश्लील वक्तव्य केलं होतं. या शोमधील त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याने चाहत्यांची माफीदेखील मागितली आहे.