राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आणि करण जोहर (Karan Johar) खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एकदा राणी करणवर रागावली होती. त्यानंतर ती आमिर खानसमोर रडली होती. राणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 'कुछ कुछ होता है' अभिनेत्रीने सांगितले की, करण जोहरमुळे ती आमिर खानसमोर खूप रडली.
करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'चा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये होस्ट करण जोहर पाहुण्या राणी मुखर्जी आणि करीना कपूर खानसोबत बोलताना दिसत आहे. दरम्यान, राणीने सांगितले की, ती 'कल हो ना हो'मुळे करण जोहरवर खूप नाराज होती.
या कारणामुळे राणी मुखर्जी करण जोहरवर झाली नाराज
राणी मुखर्जी म्हणाली, "खरे सांगू, जेव्हा मला पहिल्यांदा 'कल हो ना हो' चित्रपटाविषयी इतरांकडून कळले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. मी तुमच्या खूप जवळ आहे. तुम्ही कोणताही चित्रपट करत असाल तर मला त्याची कथा सांगा आणि इतर गोष्टी शेअर करा. तुम्ही कोणताही चित्रपट बनवा, त्या चित्रपटात तुम्ही मला कास्ट केले किंवा नाही, पण तू नेहमीच माझ्याशी तुझ्या चित्रपटांवर चर्चा केली आहेस. मी तुझ्याशी मैत्रीच्या त्या पातळीवर आहे, जिथे तू आरामात राहू शकतोस पण तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेस, त्यामुळे मी दुःखी झाले होते."
राणी आमिरसमोर लागली होती रडू
'कुछ कुछ होता है' अभिनेत्री पुढे सांगितले की, "जेव्हा मी हे दुसऱ्याकडून ऐकले तेव्हा मला वाटले की करण येऊन मला घेऊन का गेला नाही? तो माझ्याशी का बोलला नाही, त्याचे आणि माझे कोणत्या प्रकारचे नाते आहे ते त्याला माहित आहे. मला आठवतंय की मी या प्रकरणावर व्यक्त होताना मी आमिर खानसमोर रडले होते.
'कल हो ना हो'मध्ये हे होते कलाकार
'कल हो ना हो'मध्ये शाहरुख खान आणि सैफ अली खानसोबत प्रीती झिंटा लीड रोलमध्ये होती. 'कल हो ना हो' मध्ये जया बच्चन, सुषमा सेठ, रिमा लागू, लिलेट दुबे आणि डेलनाज इराणी यांच्यासह इतर स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.