Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मधील चिमुरडी कार्तिकी चक्क बनली दीपाची गुरू, देताना दिसली या गोष्टीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 07:00 IST

दीपा आणि कार्तिकीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत चक्क कार्तिकी दीपाला धडे देताना दिसते आहे

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कार्तिक, दीपा, सौंदर्या, ललित, श्वेता आणि आदित्य अशा सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच मालिकेत लीप आल्यानंतर छोट्या दीपिका आणि कार्तिकीनेही रसिकांच्या मनात घर केले आहे. या चिमुरडींनी आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकली आहेत. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदने साकारली आहे. तर तिची लेक कार्तिकीने सायशा भोईर हिने साकारली आहे. नुकताच रेश्मा आणि सायशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत चक्क सायशा रेश्माला धडे देताना दिसते आहे.

दीपा उर्फ रेश्मा शिंदे हिने नुकताच इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझ्या गोड छोट्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू आहे. या व्हिडीओत सायशा रेश्माला हुला हुप रिंग्स कशी फिरवतात हे शिकवत आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. इतकेच नाही तर सेलिब्रेटीदेखील सायशाचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओत त्या दोघींची खूप छान केमिस्ट्री पहायला मिळत आहेत.

रंग माझा वेगळा मालिका वेगळ्या वळणावररंग माझा वेगळा मालिका सध्या वेगळ्या वळणावर आली आहे. मालिकेत आयशा कार्तिकच्या लग्नासाठी मागे लागली आहे. मात्र दीपासोबत घटस्फोट झाला नसल्यामुळे ते लग्न करू शकत नाही. दरम्यान कार्तिकला दीपा दीपिकाच्या शाळेत दिसते. ही गोष्ट तो आयशाला सांगतो. त्यानंतर आयशा शाळेत जाऊन दीपा आणि कार्तिकीचा पाठलाग करते आणि दीपाला कायमचे संपवण्याची योजना आखते. ती तिच्या खोकल्याच्या औषधाची बाटली बदलून विष भरलेली बाटली एका बाईच्या मदतीने दीपाच्या घरी ठेवते. दीपा ते औषध घेते आणि तिला कसे तरी वाटू लागते. कार्तिकी आईला वाचवण्यासाठी कार्तिकच्या हॉस्पिटलकडे धाव घेते आणि कार्तिकला आई वाचवण्यासाठी मदत कर असे सांगते. आता कार्तिक दीपाचा प्राण वाचवेल का की आयशा आणखी काही खेळी करेल का हे आगामी भागात समजेल.

टॅग्स :रेश्मा शिंदेस्टार प्रवाह