Join us
Daily Top 2Weekly Top 5

Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 11:28 IST

Reshma Shinde: अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या घरी लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झाली आहे आणि ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

सध्या सगळीकडे लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच सारं काही तिच्यासाठी मालिकेतील अभिनेता अभिषेक गावकरने गर्लफ्रेंड सोनाली गुरवसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. हल्लीच तिच्या केळवणाचे फोटो समोर आले होते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे (Reshma Shinde). केळवणाच्या फोटोनंतर रेश्मा शिंदेच्या मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. ती लग्नगाठ कधी बांधणार, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तिच्या लग्नाची तारीख तिच्या मेहंदीत पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या घरी लग्नाच्या आधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. २७ नोव्हेंबरला तिच्या घरी तिचा मेहंदी सोहळा पार पडला. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी तिने मेहंदी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. चोकर नेकलेस घालून तिने सिंपल लूक केला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत. तसेच तिने शेअर केलेल्या फोटोत तिच्या मेहंदीच्या हातासोबत पार्टनरच्या हातावरीलही मेहंदी दाखवली आहे. यातून तो कोण आहे, हे समजत नाही. मात्र तिच्या हातावरील मेहंदीवर अर्धा हार्ट शेप काढून यु लिहिले आहे तर तिच्या पार्टनरच्या हातावर अर्धा हार्ट काढून एस लेटर लिहले आहे. हार्ट बनल्यावर US (आम्ही) असे पाहायला मिळत आहे. 

या दिवशी होणार लग्नभलेही रेश्मा शिंदेचा होणारा नवरा मेहंदी कार्यक्रमासाठी उपस्थित असला तरी त्याचा चेहरा पाहायला मिळाला नाही. त्यामुळे तो कोण असेल, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. इतकेच नाही तर रेश्माच्या मेहंदीमध्ये तिच्या लग्नाच्या तारखेचाही उल्लेख केलेला पाहायला मिळत आहे.

रेश्मा उद्या म्हणजेच २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या मेहंदीच्या फोटोवर तिचे चाहते तुझा होणारा नवरा कोण आहे, असे विचारत आहेत. मात्र ती कोणाशी लग्न करते आहे, हे अद्याप तिने अधिकृत जाहीर केलेले नाही.  

टॅग्स :रेश्मा शिंदे