Join us

'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:16 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नसराई पाहायला मिळत आहे. 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतून दीपाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde)नं नुकतेच बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नसराई पाहायला मिळत आहे. 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतून दीपाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde)नं नुकतेच बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली आहे. रेश्माने २९ नोव्हेंबरला महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन पद्धतीने लग्न केले आहे. सध्या तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान रेश्माचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात ती हिंदीत उखाणा घेताना दिसत आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच तिचा बॉयफ्रेंड पवनसोबत विवाहबंधनात अडकली आहे. तिने महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन पद्धतीने लग्न केले आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केले त्यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर पवनने अफव्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. यावेळी रेश्मा खूपच सुंदर दिसत होती. नंतर तिने साउथ इंडियन पद्धतीने लग्न केले. यावेळी तिने ऑरेंज गोल्डन साडी परिधान केली होती आणि पवनने गोल्डन रंगाची शेरवानी लुंगी परिधान केलेली पाहायला मिळत आहे. ते दोघे या गेटअपमध्ये खूपच छान दिसत आहे. रेश्माच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रेश्माचा हिंदीत हटके उखाणादरम्यान, सोशल मीडियावर रेश्मा शिंदेचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत रेश्मा हटके उखाणा घेताना दिसत आहे. ती उखाणा घेताना म्हणाली की, नाग को नचाने के लिये बजाते है बिम, अभी शादी हो गई पवन से और आ गयी है सब मेरी रंग माझा वेगळा की टीम. रेश्माच्या या उखाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

रेश्मा शिंदेच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील मंडळींनी हजेरी लावली होती. यात हर्षदा खानविलकर, अनघा अतुल, आशुतोष गोखले, विदीशा म्हस्कर, अभिजीत खांडकेकर, सुमीत पुसावळे, सुयश टिळक, शाल्मली तोळये, अभिज्ञा भावे, अनुजा साठे, सौरभ गोखले यांनी हजेरी लावली होती.

 

टॅग्स :रेश्मा शिंदे